IPL 2025 PBKS vs RCB Live Streaming: आरसीबीकडे पराभवाच्या परतफेडीची संधी, रविवारी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने, कोण जिंकणार?
GH News April 20, 2025 12:07 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात रविवारी 20 एप्रिलपासून रिवेंज वीकला सुरुवात होत आहे. रविवारपासून या मोसमात ठराविक संघ पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. त्यामुळे याआधी पराभूत झालेल्या संघांकडे परतफेड करण्याची संधी असणार आहे. रविवारी डबल हेडर अर्थात 2 सामने होणार आहेत. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यर पंजाबचं तर रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकमेकांविरुद्धचा दुसरा सामना असणार आहे. उभयसंघात 18 एप्रिलला झालेल्या सामन्यात पंजाबने आरसीबीचा घरच्या मैदानात धुव्वा उडवला होता. त्यामुळे आरसीबीकडे रविवारी या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.

पंजाबने शुक्रवारी आरसीबीला एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 5 विकेट्सने पराभूत केलं होतं. पावसामुळे हा सामना 14 ओव्हरचा करण्यात आला. आरसीबीने टीम डेव्हीड याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर 96 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 11 बॉलआधी पूर्ण केलं. पंजाबने यासह या मोसमातील पाचवा विजय मिळवला. तर आरसीबीने घरच्या मैदानात पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे आता आरसीबी पंजाबला त्यांच्याच घरात पराभूत करत वचपा काढणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना केव्हा?

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना रविवारी 20 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंडीगढ येथे आयोजित करण्यात आला आहे.

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येणार?

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहता येईल.

पंजाब आणि बंगळुरु पॉइंट्स टेबलमध्ये कुठे?

ताज्या आकडेवारीनुसार पंजाब किंग्स 5 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. पंजाबचा नेट रनरेट हा +0.308 असा आहे. तर आरसीबीने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. आरसीबी 8 गुणांसह आणि +0.446 नेट रनरेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.