टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल आणि त्याची पत्नी तसेच दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आथिया शेट्टी यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं. आथियाने 24 मार्च रोजी मुलीला जन्म दिला. याबाबतची माहिती केएल आणि आथियाने सोशल मीडियावरुन दिली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना या मुलीचं नाव काय ठेवलं जाणार? याची प्रतिक्षा होती. क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. केएलने आपल्या वाढदिवशी इंस्टा स्टोरीतून मुलीचं नाव जाहीर केलं आहे. तसेच केएलने आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ काय? हे देखील इंस्टा स्टोरीतून सांगितलं आहे. केएल आणि आथिया यांनी त्यांच्या मुलाचं नाव इवारा असं ठेवलं आहे.
केएल राहुल सध्या आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळतोय. केएल दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व करतोय. केएलने काही दिवसांपूर्वी आथियाच्या प्रसुतीआधी टीमची साथ सोडली होती. इराहच्या जन्माआधी केएल कुटुंबियांसह उपस्थित होता. त्यामुळे केएलला काही सामन्यांना मुकावं लागलं. त्यानंतर आथिया आणि केएलला कन्यारत्न झाल्याचं समजताचं दिल्ली कॅपिट्ल्सच्या सहकाऱ्यांनीही इराहचं खास स्वागत केलं होतं. हा व्हीडिओ सोशल माीडियावर पोस्ट करण्यात आला होता.
इवारा नावाचा अर्थ काय?
केएल राहुलने इंस्टाग्रामवर त्याची पत्नी आथिया आणि मुलगी इवारासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. मात्र केएलने इवाराचा चेहरा दाखवलेला नाही. केएलने कॅप्शनद्वारे इवारा नावाचा अर्थ सांगितला आहे. इवाराचा अर्थ म्हणजे देवाने दिलेली भेट, असं केएलने सांगितलं आहे. तसेच इवारा आमच्यासाठी सर्व काही आहे, असंही केएलने नमूद केलं आहे.
केएल राहुल आणि आथिया शेट्टी जानेवारी 2025 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत केएल आणि आथियाचं लग्न पार पडलं. त्याआधी दोघेही एकमेकांना डेट करत होते. केएल आणि आथियाने नोव्हेंबर 2024 मध्ये ते दोघेही लवकर आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
दरम्यान केएल राहुल याने आतापर्यंत आयपीएलच्या 18 व्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे. केएलने 5 सामन्यांमध्ये 59.50 सरासरी आणि 154.54 च्या स्ट्राईक रेटने 238 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 2 अर्धशतकंही लगावली आहेत. केएलने आरसीबी विरुद्ध नाबाद 93 धावांची खेळी केली आणि दिल्लीला विजयी केलं. दिल्लीने केएलसाठी मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.