RCB vs PBKS Live: दोन तासांच्या विलंबाने Toss झाला, बंगळुरू वि. पंजाब सामन्यात षटकांची संख्या कमी झाली; पॉवर प्ले किती षटकांचा?
esakal April 19, 2025 03:45 AM

IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातली लढत पावसामुळे उशीराने सुरू होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव सुरू आहे आणि त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकही वैतागले आहेत. काही काळ सामना थांबल्याने मैदानाची पाहाणी करण्यात आली होती, पंरतु ७:२० वाजता पावसाने पुन्हा फटकेबाजी सुरू केली आणि अधिकारी पुन्हा पॅव्हेलियनच्या दिशेने परतले. १०:४१ ही कट ऑफ वेळ ठेवली गेली आहे आणि १०:५६ वाजेपर्यंत सामन्याला सुरुवात केली जाऊ शकते. मॅच ५-५ षटकांची खेळवली जाईल. पण, आता तेही संकट दूर झाले आहे.

९ वाजता पाऊस थांबला आणि मैदानाची पाहणी करण्यात आली. चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज प्रणाची उत्तम असल्याने पाण्याचा निचरा पटकन झाला आणि दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर फुटबॉल सराव करताना दिसले. पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतपर्यंत ३३ सामने झाले आणि त्यापैकी १६ सामने RCB ने तर १७ सामने PBKS ने जिंकल्या आहेत. ९.३० वाजता नाणेफेक होणार असल्याची घोषणा झाली आणि ९.४५ वाजता मॅच सुरू होणार आहे. ( Toss at 9.30pm, and match starts at 9.45pm.)

जवळपास दोन तासानंतर ही मॅच सुरू झाली आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मॅच सुरू होण्यास विलंब झाल्याने १४-१४ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. आजच्याच दिवशी बंगळुरूने २००८ मध्ये आयपीएलचा पहिला सामना घरच्या मैदानवार खेळला होता. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्कस स्टॉयनिस आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या जागी परतला आहे. हरप्रीत ब्रारला आज संधी दिली गेली आहे.

१४-१४ षटकांच्या या सामन्यात ४ षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. दोन्ही संघांतील प्रत्येकी ३ गोलंदाज किमान ४ षटकं पूर्ण टाकू शकणार आहे आणि १ गोलंदाज किमान २ षटकं फेकू शकेल. बंगळुरूच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल झालेला नाही.

RCB XI: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, लिएम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार , जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा

PBKS XI: प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, नेहाल वढेरा, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, झेव्हियर बार्टलेट्ट, अर्शदीप सिंग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.