Suraj-Abhijeet : टॉपचा गायक अन् टॉपचा किंग एकत्र, 'झापुक झुपूक' गाण्यावर अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स,पाहा video
Saam TV April 19, 2025 08:45 PM

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या आगामी चित्रपट झापुक झुपूक' मुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतीच त्याने इंडियन आयडलचा विजेता आणि 'बिग बॉस मराठी 5'चा उपविजेता अभिजीत सावंतचा भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे खास व्हिडीओ सूरजने सोशल मिडियावर शेअर केले आहे. ज्याच्यावर प्रेक्षकांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) सूरजसोबत 'झापुक झुपूक' गाण्यावर गुलीगत स्टाइलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. तसेच अभिजीतने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि खास गाणे सूरजसाठी गायले आहे.

सूरजने सोबतचे दोन व्हिडीओ टाकले आहेत ज्याला सूरजने हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने एका व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माझा लाडका मोठा भाऊ आणि आपल्या भारताचा "टॉप चा गायक" अभि दादा…! अभि दादासोबत झापुक झुपूक गोलीगत नाचायला मला लईच जब्बर मज्जा आली…! कसला भारी नाचलाय अभि दादा... अभिजीत सावंत (अभि दादा) आय लव यू… २५ एप्रिल - झापुक झुपूक… हाउसफुल्ल राडा करा…"

दुसऱ्या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, "आपल्या भारताचा पहिला "इंडियन आयडल" आणि माझा मोठा भाऊ अभिजीत सावंत (अभि दादा) याला बिग बॉस नंतर आज पुन्हा भेटून लई आनंद झाला…शिल्पा ताईं तुमच्या हातचं घरचं जेवून लई समाधान मिळाले आणि आज अभि दादाच्या आईचे म्हणजेच माझ्या आईचे आशीर्वाद घेऊन खूप बरं वाटलं. अभी दादा, ताई आणि आई तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम राहूदे…!लवकरच परत भेटूया...२५ एप्रिल का अख्यांनी आपल्या जवळच्या थेटरात जाऊन '' नक्की बघायचा…"

अभिजीत सावंत काय म्हणाला?

अभिजीत सावंतने देखील व्हिडीओमध्ये सूरज चव्हाणचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, "20 वर्षांपूर्वी माझी देखील अशीच सुरुवात झाली होती. मी छोट्याशा मध्यमवर्गीय घरातून आलो होतो. मी देखील एका रिअॅलिटी शोमधून वर आलो आहे. मी नेहमी म्हणतो की सूरजमध्ये मी स्वतःला पाहतो. एक साधा मुलगा येथपर्यंत पोहचला आहे आणि त्याची प्रगती अशीच चालत राहू दे. "

पुढे अभिजीत म्हणाला,"माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ गाणे त्याच्यासाठी बोलतो आज. 'कितना सुहाना सा ये अपना सफर है' तुम्हा सर्व प्रेक्षकांना सांगायचे आहे की ज्याप्रकारे तुम्ही मला प्रेम दिले तसेच प्रेम तुम्ही सूरज आणि 'झापुक झुपूक' चित्रपटाला देखील द्या. ही फिल्मपण खूप हिट होऊ दे.. हीच देवा चरणी प्रार्थना..."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.