GT vs DC : अक्षरने दिल्लीच्या पराभवासाठी कोणाला धरलं दोषी? तर गिलने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना
GH News April 20, 2025 12:07 AM

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच 200 पार धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सने आरसीबीविरुद्द 198 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. विशेष म्हणजे गुजरात टायटन्सने मोठ्या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकातच टार्गेट गाठलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं.हे आव्हान गुजरात टायटन्सने 3 गडी गमवून 19.2 षटकात पूर्ण केलं. खरं तर एक क्षण असा होता की सामना दिल्ली कॅपिटल्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण जोस बटलरने सामना खेचून आणला. या सामन्यानंतर पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आपलं मत मांडलं आहे. अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्हाला 10-15 धावा कमी पडल्या. आम्ही वेग वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही विकेट गमावत राहिलो. आम्हाला हव्या त्या पद्धतीने खेळ संपवता आला नाही. आम्ही चांगली गोलंदाजी केली. जर आम्ही आणखी काही संधी निर्माण केल्या असत्या तर परिस्थिती जवळ आली असती. ही काही फटक्यांची बाब होती. या पराभवाबद्दल आम्ही जास्त विचार करणार नाही.’

विजयानंतर शुबमन गिलनेही आपलं मत मांडत म्हणाला की, ‘एकेकाळी असे वाटत होते की एकूण धावसंख्या 220-230 होईल. आम्ही ज्या पद्धतीने त्यांना खाली खेचलं त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते. पहिल्या सामन्यातही 245 धावांचा पाठलाग करताना आम्ही खेळात बरोबर होतो, फक्त 10 धावांनी हरलो. आम्ही चांगला पाठलाग करत आहोत, आम्ही चांगला बचाव करत आहोत.’

‘अक्षरच्या फलंदाजीमुळे ते सामन्यात पुढे होते. वेगवान गोलंदाजांना फटका मारणे कठीण होते, म्हणून आम्हाला वाटले की आम्ही त्यांच्यासोबत खेळत राहू. रन आऊट होणं होण्याची निराशाजनक असतं. परंतु आमच्याकडे येथे बरेच सामने आहेत आणि आशा आहे की मला संधी मिळेल. बटलर आणि रदरफोर्डने ज्या पद्धतीने स्ट्राइक रोटेट केले आणि त्यांनी मारलेले फटके जबरदस्त होते. त्यांनी खूप विचारपूर्वक फलंदाजी होती, ती पाहणे एक आनंदाची गोष्ट होती. हा विजय मिळवून खूप आनंद झाला.’, असं शुबमन गिल पुढे म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.