भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेत्याने शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, प्रभास आणि रणबीर कपूरला मागे टाकले आहे.
या उंचीने लहान पण कामाने महान असलेल्या जाफर सादिकची उंची 4फूट 8 इंच आहे. मात्र त्याने आपल्या अभिनयाने यशाचे मोठे शिखर गाठले आहे.
जाफर सादिकचा बॉलिवूड ते साउथ इंडस्ट्रीत देखील डंका पाहायला मिळत आहे. जाफर सादिक फक्त 29 वर्षांचा आहे.
जाफर सादिकला 'विक्रम', 'जेलर' आणि 'जवान' या चित्रपटांतून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. शेवटचा जाफर सादिक वरूण धवनच्या 'बेबी जॉन'मध्ये दिसला.
जाफर सादिकने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत काम केले आहे. तो 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'जवान' चित्रपटात त्याने काम केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार , जाफर सादिकने 5 वर्षांत चित्रपटातून त्याने तब्बल 2200 कोटींच्या वर कमाई केली आहे.
जाफर सादिकने 'पावा कधिगल' या 2020 मध्ये रिलीज झालेल्या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
'विक्रम' चित्रपटात जाफर सादिक खलनायकाच्या भूमिकेत झळकला. यात त्याने कमल हासन आणि विजय सेतुपतीसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं.