आळेफाटा, ता. १८ : राजुरी (ता. जुन्नर) येथील दक्षिण विभागात असलेल्या मुंजोबा महाराज वारकरी सेवा मंडळ पुरस्कृत पंचम तपपूर्ती अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमात काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ तसेच दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तनसेवा होणार आहे. त्यात तुकाराम महाराज मुळीक, स्वरभास्कर बाळासाहेब महाराज रंजाळे, एकनाथ महाराज शास्त्री, भाषा प्रभू डॉ. पंकज महाराज गावडे, सुलभ महाराज बनकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा अशी विनंती मुंजोबा महाराज वारकरी सेवा मंडळाच्या वतीने केली आहे.