संगग्राम थोपेट पुणे : राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा (संगग्राम थोपेट Resignation to Congress) दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि भोर येथील मोठं राजकीय घराणं म्हणून थोपटे कुटुंबियांकडे बघितलं जातं. त्यातच संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. अशातच संग्राम थोपटे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असून ते पक्षाला राम-राम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती.
दरम्यान विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव, तसेच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सत्तेची आस, हे मुख्य कारण पुढे करत त्यांनी अखेर पक्षाला राजीनामा दिला असल्याचे बोललं जात आहे. मात्र महाविकास आघाडीतील बडे बडे नेते भाजपच्या कंपूत विराजमान होत असताना पुण्यातील आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला पुण्यात हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात संग्राम थोपटे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..