एलन मस्क रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ते अशी काही गोष्ट करतात की सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा सुरू होते. आता त्यांनी पुन्हा एकदा बाप बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बरं बाप होणं काही वाईट नाही. पण त्याने ही इच्छा त्याच्या बायकोकडे केली नाही. एका सोशल मीडिया एन्फ्लूएन्सरकडे त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. तू माझ्या मुलांची आई होणार का? असं त्याने थेट या महिलेला विचारलं. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून एक क्रिप्टो एन्फ्लूएन्सर आणि युट्यूबर टिफनी फोंग आहे.
तथापि टिफनी फोंगने मस्क यांची ही ऑफर नाकारली आहे. बरं हा किस्सा काही इथेच संपला नाही. तर याच वर्षी एका महिलेने तिला मस्क यांच्याकडून एक मुलगा झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती.
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, मस्कने क्रिप्टो एन्फ्लूएन्सरला थेट सवाल केला होता. तू माझ्या मुलाला जन्म देशील का? विशेष म्हणजे मस्क आणि ती महिला एकमेकांना ओळखतही नाही. ते कधीच एकमेकांना भेटले नाहीत. त्यामुळे ही महिला एक साधारण व्यक्ती आहे की फेमस व्यक्ती आहे याची आता चर्चा रंगली आहे.
फोंग क्रिप्टो कम्युनिटीचा नावाजलेला चेहरा आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर फोंगचे 335,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर 48,000 हून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. या इन्फ्ल्यूएन्सर्सने अनेक बड्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे ती सोशल मीडियावर अधिकच लोकप्रिय आहे. फोंगने FTX चे संस्थापक Sam Bankman-Fried यांचीही स्पेशल मुलाखत घेतली आहे.
WSJच्या रिपोर्टनुसार, मस्कने वर्ष 2024मध्ये एक्सवर फोंग सोबत चॅटिंग सुरू केली होती. बातचीत सुरू होताच फोंगला एक्सवर चांगली एंगेजमेंट मिळू लागली. त्यामुळे फोंग अधिकच खूश झाली. पण त्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने तिला असा काही सवाल केला की त्यामुळे तिला धक्काच बसला. फोंगला ही गोष्ट आश्चर्यकारक वाटली. कारण ती मस्कला कधीच भेटली नव्हती. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ती मस्कला ओळखत होती.
मस्कची ही ऑफर फोंगने नाकारली. त्यासाठी तिने मस्कला एक मोठं कारण दिलं. मला ट्रॅडिशनल फॅमिली आवडते असं ती म्हणाली. मीडिया रिपोर्टनुसार, फोंगने नकार दिल्यानंतर मस्कने फोंगला एक्सवर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे फोंग घाबरली. आपल्या एंगेजमेंटवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती तिला वाटली. एलन मस्कने आतापर्यंत चार महिलांशी विवाह केला आहे. त्याला 14 मुलं आहेत. तरीही तो पाचव्यांदा लग्नाच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.