मुलांच्या परीक्षा संपताच घराघरात फिरायला जाण्याची तयारी सुरू होते. परिक्षेचा ताण हा नकोसा झालेला असतो. परीक्षा मुलांची असते, पण संपूर्ण घराची परीक्षा असल्याचे वातावरण घरात असल्याचे दिसते. त्यामुळे कधी परीक्षा संपते आणि आपण बाहेर फिरायला जातो असे मुलांना वाटते. तुमच्याही घरी अशी काही तयारी सुरू झाली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. लहान मुलांना फिरायला घेऊन जायचे म्हणजे ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण मुलांसाठी सुरक्षित असणे महत्त्वाचे असते. शिवाय ट्रिप बजेटमध्ये बसणंही आवश्यक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुलांसह उन्हाळी सुट्टी कुठे एन्जॉय करता येईल. याची काही बजेटमधील ठिकाणे सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही मुलांसोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकता.
तुमची मुलं लहान असतील तर तुमच्यासाठी माउंट अबू हे ठिकाण उत्तम राहील. हे राजस्थानमधील एकमेव हिलस्टेशन आहे. येथे नाक्की लेक आणि रॉक व्ह्यू पॉइंटसारखी ठिकाणे भेट देता येतील.
मुलांना प्राणी, पक्ष्यांची ओळख करून द्यायची असल्यास रणथंबोर नॅशनल पार्क हे ठिकाण उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
कमी बजेटमध्ये फिरायला जाण्यासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश येथे जाता येईल.
उत्तराखंडमधील डलहौसी हे ठिकाण मुलांसह उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे.
मसुरी हे ठिकाण 7000 फूट उंचीवर आहे. उन्हाच्या लाहीलाहीपासून सुटका हवी असल्यास येथे नक्की जा.
दार्जिलिंग पश्चिम बंगालमधील एक हिलस्टेशन आहे. येथे चहाच्या बागा, साहसी उपक्रम सर्वात विशेश म्हणजे येथेील टॉय ट्रेन मुलांना प्रचंड आवडेल.
नेपाळ हे ठिकाण उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे मुलांना मंदिरे, दऱ्या दाखवता येतील.
उन्हाळ्यात थंडाव्याचा आनंद घ्यायचा असेल तर महाबळेश्वरला नक्की जायला हवे.
सुट्टीसाठी सर्वात प्रसिद्ध असलेले ठिकाण लोणावळ्याला मुलांसह सुट्टीचा आनंद घेता येईल. येथे अनेक साहसी क्रिया करता येतील.
हेही पाहा –