Sonu Sood: सोनू सूदचा शिक्षणासाठी पुढाकार; १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
Saam TV April 19, 2025 10:45 PM

Sonu Sood: कोरोना काळात गरजूंना मदत करून 'मसीहा' म्हणून ओळख मिळवलेले अभिनेता सोनू सूदने आता शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यातील १०० गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे.

सोनू सूदच्या 'सूद चॅरिटी फाउंडेशन'च्या माध्यमातून या मुलांना शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये शाळेची फी, पुस्तके, गणवेश आणि इतर आवश्यक गोष्टींचा समावेश आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना नवी संधी मिळणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी देवासचे जिल्हाधिकारी ऋषव गुप्ता यांनी उपस्थित राहून सोनू सूद यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, स्थानिक अधिकारी आणि नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. सोनू सूदन यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याने 'प्रोफेसर सरोज सूद शिष्यवृत्ती'च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे. तसेच, त्याने गरीब मुलांसाठी शाळा बांधण्याचे आवाहनही केले आहे.

च्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो नुकताच या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करु शकला नसला तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, काही दिवसांपूर्वी सोनू सूदची पत्नी सोनली सूदचा मोठा अपघात झाला असून यातून ती हळूहळू बरी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.