MI vs CSK: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, ३७ वर्षीय 'शर्मा' आज टांग देणार, CSK विरुद्ध खेळण्याची शक्यता कमी, कारण काय तर...
esakal April 20, 2025 06:45 PM

चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील त्यांच्या घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात चा पराभव केला होता. आता त्याची परतफेड करण्याची संधी मुंबई इंडियन्सला मिळाली आहे. कारण, मुंबई त्यांच्या घरच्या मैदानावर CSK चा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांची IPL 2025 मधील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. अशात आता दोन्ही संघांना प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. असे असताना मुंबईच्या गोटातून चिंता व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ ७ सामन्यांत ३ विजयासह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे आणि प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना उर्वरित सातपैकी किमान ५ सामने जिंकावे लागणार आहेत. ला जरा जास्त जोर लावावा लागेल, कारण ७ पैकी दोन सामने ते जिंकले आहेत. त्यांना उर्वरित सात सामन्यांपैकी ६ मध्ये विजय आवश्यक आहे. तरीही त्यांचे स्थान निश्चित होईल, याची खात्री नाही. दोन्ही संघांसाठी करा किंवा घरी बसा अशी परिस्थिती आहे.

मुंबई इंडियन्स विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी आज उतरणार आहे, परंतु त्यांचा स्टार फिरकीपटू कर्ण शर्मा ( Karn Sharma ) आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. मागील सामन्यात त्याच्या हाताला चेंडू लागला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेल्या कर्ण शर्माने तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि तो प्लेअर ऑफ दी मॅच ठरला होता. काल मुंबईच्या सराव सत्रात कर्णच्या हाताला टाके पडलेले दिसले.

मुंबईचा अष्टपैलू मिचेल सँटनर याने कर्णच्या जखमेवर टाके पडल्याचे सांगितले आणि आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत दिले. 'त्याच्या हाताला काही टाके पडले आहेत. तो आज सराव सत्रात होता, परंतु तो गोलंदाजी करेल का किंवा चेन्नईविरुद्ध खेळणार का, याबाबत मलाही खात्री नाही. त्याचा हात किंचितसा कापला गेला आहे,' असे सँटनर म्हणाला.

नूर अहमद हा आजच्या सामन्यात मुंबईची डोकेदुखी वाढवू शकतो, अशी शक्यता सँटनरने व्यक्त केली आहे. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा नूर अहमद १२ विकेट्स सह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.