Maharashtra Live Updates : महाराष्ट्रद्रोही कोण? हे विचारण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही - संदीप देशापांडे
Sarkarnama April 21, 2025 01:45 AM
Sandeep Deshapande : उद्धव ठाकरे माफी मागणार का? संदीप देशपांडेंचा सवाल

महाराष्ट्रद्रोही कोण? हे विचारण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. भोंग्यांसाठी आमच्यावर 17 हजार केसेस टाकल्या जातात, मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित करत ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.

Ajit Pawar : हेलिकॉप्टर खराब झाल्याने अजितदादांचा दौरा रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते येणार होते. नाशिकमध्ये येण्यासाठी अजित पवार महालक्ष्मीला पोहचले होते परंतू जुहू वरून येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला झाल्याने ते आले नसल्याचं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

Sanjay Raut : काही लोकांना ठाकरे बंधू एकत्र नकोत - राऊत

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यात कोणत्याही अटी शर्ती नाही. मात्र ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं महाराष्ट्रातील काही लोकांना वाटत नसल्याचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवाय दोन्ही बंधू मतभेद दूर ठेऊन एकत्र येत असतील आम्ही त्याचे स्वागत करु असंही राऊतांनी म्हटलं आहे.

Pune Congress : पुण्यात काँग्रेसला गळती सुरूच

पुण्यात काँग्रेसला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. कारण संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ आता युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.

व्हाईट हाऊससमोर अमेरिकन नागरिकांचे आंदोलन

अमेरिकेचे राष्ट्रध्यध्यांचे निवासस्थान व्हाईट हाऊसला अमेरिकन नागरिकांनी घेरावा घातला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध निर्देशन करण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाला तसेच सरकारी नोकऱ्यांमधील कपालीला विरोध करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांचा राजीनामा

महाराष्ट्रात काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. अश्यातच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला नाराज नेतेमंडळींची मनधरणी करता येत नसल्याचेच दिसून येत आहे. पक्षातील नेतेमंडळींमध्ये समन्वय नसून अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते हताश असल्याची परिस्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना - अमेय खोपकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-मनसेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा आहेत. राज-उद्धव ठाकरे एकत्र असल्याच्या चर्चा होत असताना संदीप देशापांडे यांच्या पाठोपाठ मनसेतील नेते अमय खोपकर यांनी देखील अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे ट्विट करत शिवसेना UBT-मनसेच्या युतीला विरोध केला आहे.

एकत्र येणं म्हणजे एकत्र निवडणुका लढणे नाही - संदीप देशपांडे

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्या चर्चा सुरू असताना मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही. मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकत जसे तामिळनाडू मध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात तसं मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे. फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे.

Kulbhushan Jadhav : कुलभूषण जाधवला अपिलाची संधीही नाही

पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव याला झालेल्या शिक्षेविरोधात अपिल करण्याची परवानी देखील देण्यात आली नाही. त्याला केवळ दुतावासाच्या सल्लागार सेवेची मुभा देण्यात आली, अशी कबुली पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. कुलभूषणला अपिल करणयाची परवानगी नाकारणे हा आंतराराष्ट्रीय कायद्यांचा भंग आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.