Morning Leg Symptoms: शरीराचे रक्त धमन्यांद्वारे ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे महत्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचवते. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे अनेकदा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका असतो. रक्तवाहिन्या बंद पडल्यामुळे अनेकांना पायांमध्ये विविध समस्या येऊ शकतात.
रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे, पायांमध्येही काही लक्षणे दिसून येतात. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास पाय आणि शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो. जेव्हा पायांच्या धमन्या अडथळ्यामुळे अरुंद होऊ लागतात तेव्हा या स्थितीला परिधीय धमनी रोग (PAD) म्हणतात. शरीरातील ब्लॉकेज कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.
कारणे कोणती?जेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर चरबी आणि कोलेस्टेरॉल जमा होतात तेव्हा रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. याला परिधीय धमनी रोग म्हणून ओळखले जाते. धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनियंत्रित रक्तातील साखरेची पातळी आणि बसून राहणे किंवा व्यायाम न करणे यासारख्या गोष्टींमुळे समस्या वाढू शकते आणि पायांमध्ये रक्त प्रवाह कमी करतात आणि वेदना वाढण्याचा धोका वाढू शकतो.
लक्षणे कोणतीचालताना पाय दुखणे
पाय सुन्न होणे
पायांमध्ये कमकुवतपणा जाणवणे
पाय थंड पडणे
नखांची वाढ न होणे
नखांवर चमक कमी होणे
तज्ज्ञांच्या मते, जर ही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण वेळेवर निदान आणि उपचार केल्याने समस्या कमी करता येते.
ब्लॉकेजचे निदान कसं करावं?बंद असलेल्या रक्तवाहिन्यांचे निदान करण्यासाठी, तज्ञ घोट्याच्या-ब्रेकियल इंडेक्स (ABI) सारख्या चाचण्या तसेच काही शारीरिक चाचण्या करण्याचा सल्ला देतात. घोट्याची तपासणी केली जाते आणि हातातील रक्तदाब पातळी तपासली जाते. याशिवाय, डॉपलर अल्ट्रासाऊंड, सीटी अँजिओग्राफी किंवा एमआर अँजिओग्राफी सारख्या इमेजिंग स्क्रीनिंगच्या मदतीने ब्लॉकेजची पातळी तपासली जाते. या चाचण्यांच्या मदतीने रुग्णासाठी योग्य उपचार ठरवता येतात.
पुढील उपाय करावेरक्तप्रवाह सुरळित राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा.
धूम्रपान करणे टाळावे.
संतुलित आहार घेणे
रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवावा.
तसेच नियमितपणे चाचण्या आणि स्क्रीनिंग करा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.