सोलापूर : घर बांधायला व गाडी घ्यायला ८० हजार रुपये व रिक्षा घेण्यासाठी एक लाख रुपये माहेरवरून घेऊन ये म्हणून छळ केल्याची फिर्याद पद्मिनी रामदास कोळेकर (वय ३८, रा. रोहिणीनगर, भाग ३, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात दिली.
या फिर्यादीवरून पती रामदास, सासू शांताबाई, सासरा यशवंत, दिर रमेश (सर्व रा. औज, ता. दक्षिण सोलापूर) नणंद शोभा, नंदेचा नवरा बलभीम टेळे (सर्व रा. नांदणी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.