Kis Kisko Pyaar Karoon 2: १ नवरा, ४ बायका… ; कपिल शर्मा झाला ख्रिश्चन, 'किस किस को प्यार करूं २' चे पोस्टर चर्चेत
Saam TV April 21, 2025 02:45 AM

Kis Kisko Pyaar Karoon 2: बॉलिवूडमध्ये हास्यराजा म्हणून प्रसिद्ध असलेले कपिल शर्मा त्यांच्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’मुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकताच या चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये कपिल ख्रिश्चन वधू-वराच्या वेशात दिसत आहेत. पोस्टरमधील त्यांच्या या नव्या लुकने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

या चित्रपटात कपिल पुन्हा एकदा विनोदी शैलीत अनेक पत्नींसोबतच्या गोंधळलेल्या आयुष्याची कहाणी मांडताना दिसणार आहेत. पहिल्या भागात त्यांच्या तीन पत्नी होत्या, तर यावेळी चाहत्यांच्या अंदाजानुसार तो आकडा चारपर्यंत जाऊ शकतो. त्यांच्या वेशभूषेवरून आणि सेटअपवरून प्रेक्षकांना धार्मिक आणि सामाजिक विषयांची झलक देखील दिसत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरून असे दिसते की यावेळी कथा अधिक मजेदार आणि पेचप्रसंगांनी भरलेली असेल. कपिलच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्टरवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी विचारलं, “यावेळी च्या किती बायका असणार?” तर काहींनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार असे विचारले आहे.

‘’च्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या भागासाठी तयारी केली आहे. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. कपिलचा हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.