Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच 'निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस' या थरारक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचा भाऊ कुश सिन्हा करत असून, या चित्रपटातून तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, यात सोनाक्षीचा गंभीर आणि रहस्यमय लूक पाहायला मिळतो. हा चित्रपट ३० मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'' हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असून, यात सोनाक्षी सिन्हासोबत परेश रावल, सुहेल नय्यर आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा रहस्य, अध्यात्म आणि मानवी मनाच्या गुंतागुंतीवर आधारित आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लंडन आणि युनायटेड किंगडममधील विविध ठिकाणी झाले असून, केवळ ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे .
या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना सोनाक्षीने लिहिले आहे की, "निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस लवकरच येत आहे. कुश सिन्हा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे आणि मी ज्येष्ठ अभिनेते परेश रावल सर आणि सुहेल नय्यर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे."
चित्रपटाची निर्मिती निक्की आणि विक्की भगनानी यांनी केली असून, अंकुर टाकरानी, दिनेश गुप्ता सहनिर्माते आहे.. चित्रपटाच्या कथानकाबद्दल अधिक माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही, मात्र पोस्टरमधून चित्रपटाच्या रहस्यमय आणि थरारक स्वरूपाची झलक मिळते. चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता वाढली असून, चाहत्यांना ३० मे रोजी चित्रपटगृहात 'निकिता रॉय' पाहण्याची उत्सुकता आहे.