Sharmishtha Raut : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला कन्यारत्न, लेकीच्या नावाचा अर्थ नेमका काय?
Saam TV April 21, 2025 02:45 PM

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला आहे. बिग बॉसमुळे लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut ) ही आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आजवर तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा आई झाली आहे.

नुकतच लेकीचे थाटात बारसे पार पाडले आहे. तिच्या बारशाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सोहळ्याला मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारमंडळींना उपस्थिती लावली होती. बारशाला शर्मिष्ठा आणि तिच्या नवऱ्याने मराठमोळा लूक केला होता. शर्मिष्ठाच्या नवऱ्याचे नाव तेजस देसाई असे आहे. दोघेही एकत्र खूपच छान दिसत होते.

लेकीचे नाव आणि नावाचा अर्थ

शर्मिष्ठा राऊतने आपल्या३ लेकीचे नाव 'रुंजी' असे ठेवले आहे. 'रुंजी' च्या नावाचा अर्थ स्पष्ट करत शर्मिष्ठा म्हणाली, "'' (Runji ) म्हणजे अकस्मात सुंदर होय तर दुसरा अर्थ असा की, मनात सतत घोळत राहणे. एकदा तुम्ही रुंजीला पाहिलात आणि तिच्याशी साधलात तर तुमच्या मनातून ता जाणार नाही. "

शर्मिष्ठाचा लूक

लेकीच्या बारशाला आई-बाबा पारंपरिक अंदाजात पाहायला मिळाले. शर्मिष्ठानं पांढऱ्या आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर तेजसने शर्मिष्ठाला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोती, पैठणीचं लाल रंगाचं जॅकेट परिधान केले होते. दोघे देखील खूपच सुंदर दिसत होते. सध्या या जोडप्यावर प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2020 मध्ये शर्मिष्ठा आणि तेजस लग्नबंधनात अडकले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.