इस्रोचा अनोख प्रयोग : शुभांशु शुक्लांची लवकरच अंतराळमोहीम
वृत्तसंस्था/ बेंगळूर
एक भारतीय अंतराळवीर लवकरच अंतराळात पाऊल ठेवणार आहे. या मोहिमेदरम्यान भारतीय अंतराळवीर एका प्राण्याला घेऊन जाणार आहे. या अंतराळमोहिमेचे नाव एक्सियोम-4 असून यात भारताचे नागरिक शुभांशु शुक्ला सामील असणार आहेत. शुभांशु शुक्ला हे अंतराळ स्थानकावर पोहोचून तेथे वास्तव्य करणार आहेत. तसेच या मोहिमेवेळी ते स्वत:सोबत अत्यंत अजब सुक्ष्म जीव वोएजर टार्डीग्रेड्सला नेणार आहेत.
या प्राण्याला वॉटर बियर किंवा मॉस पिगलेट देखील म्हटले जाते. हा सुक्ष्मजीव मायक्रोस्कोपशिवाय दिसू शकत नाही. परंतु हा जीव एखाद्या आश्चर्यापेक्षा कम नाही, याला जल, बर्फ, आग, व्हॅक्यूम, किरणोत्सर्ग किंवा अंतराळाची कठोर स्थितीही नष्ट करू शकत नाही. याचे शरीर 8 पायांचे असते आणि त्याच्या पंज्यांमध्ये छोटी टोकदार नखं असतात, या प्राण्याचा चालण्याची शैली एखाद्या अस्वलासारखा असतो.
विशेष दुरुस्ती
या प्रयोगात शुभांशू शुक्ला हे अंतराळ स्थानकावर 14 दिवसांपर्यंत या टार्डीग्रेड्ससोबत राहणार आहेत. या जीवाचे पुनर्जीवन, जीवन रक्षण आणि प्रजननावर संशोधन होणार आहे. अंतराळाच्या शून्य गुरुत्वाकर्षणात हा अजब जीव कशाप्रकारे वागतो हे पाहिले जाणार आहे. अंतराळात राहिल्यावर या प्राण्याच्या डीएनएमध्ये कोणते बदल होतात हे देखील अभ्यासले जाणार आहे. या संशोधनाचा उद्देश भविष्यात अंतराळवीरांना सुरक्षित ठेवणे, दीर्घ अंतराळ प्रवासासाठी मानवी शरीर समजून घेणे आहे. इस्रोच्या या अभियानाद्वारे भारत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळस्थनाकावर जिवंत प्रयोग करणार आहे.