भंडारा गुन्हा: हळू आवाजात बोला, असं म्हटल्यानं राग अनावर झाल्यानं सहा ते सात जणांच्या एका टोळक्यानं एकाला बेदम मारहाण केली. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी (Lakhani) येथील एका बिअर बारमध्ये (Beer Bar) घडली. धनराज वाघाये असं मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नावं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्याच्या (Bhandara Crime News) लाखनी येथील एका बिअर बारमध्ये धनराज हा एकटाचं एका टेबलवर दारू पीत होता. त्याच वेळी त्याच्या बाजूला सहा ते सात तरुण मद्यप्राशन करण्यासाठी बसलेले होते. यावेळी सदर तरुण मोठं मोठ्यानं बोलतं असल्यानं धनराज याने त्यांना हळू आवाजात बोला, असं म्हटलं.
धनराज याने हळू आवाजात बोला, असं म्हटल्यानं बाजूच्या टेबलवरील सहा ते सात जणांनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. सहा ते सात जणांनी धनराज याला बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला. तसेच धनराजचे कपडे देखील फाडण्यात आले. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. हा संपूर्ण थरारक प्रकार बिअर बार मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दरम्यान, भंडाऱ्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पहेला गावात शनिवारी (दि. 12) मध्यरात्री चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका महिलेसह चौघांना बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद मुबारक सय्यद (22) या युवकाचा 15 एप्रिल रोजी सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद मुबारक सय्यद याच्यासह पृथ्वीराज खंगार (35), धनराम टेकाम (40) आणि रज्जू सय्यद (55) हे तिघे जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री गावातील सुमारे 20 ते 25 ग्रामस्थांनी मोहम्मदच्या घरी जाऊन त्याच्यासह पृथ्वीराज व धनराम यांना चोर असल्याच्या संशयावरून विचारपूस करत मारहाण केली. मोहम्मदला वाचविण्यासाठी आलेल्या त्याच्या आई रज्जू सय्यद यांनाही जमावाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर रज्जू सय्यद यांच्यावर नागपूरमध्ये आणि पृथ्वीराज व धनराम यांच्यावर भंडाऱ्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..