ATM नियम बदलणार, 1 मेपासून पैसे काढणे महागणार, बॅलन्स चेक करण्यासही लागणार चार्ज
Marathi April 21, 2025 06:25 PM

मुंबई : देशभरात डिजिटल व्यवहार वाढले आहेत, मात्र एटीएम (एटीएम) मशिनमधून रोकड काढण्यासाठीही ग्राहकांची रांग पाहायला मिळते. त्यामुळे, देशात एटीएम युजर्संची संख्या देखील कोट्यवधींच्या घरात आहे. राष्ट्रीय बँकांसह आता सहकारी आणि पतपेढी बँकांनी देखील एटीएम सेवा सुरू केल्याने आता गाव तिथं एटीएम पाहायला मिळत आहे. बँकेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा हवे तेवढे आणि गरज असेल तेव्हा बँकेतून (Banking) पैसे काढण्यासाठी एटीएम ही उत्तम सेवा आहे. आता, याच एटीएम ग्राहकांसाठी 1 मे पासून नियमांत बदल होत आहे. म्हणजेच, एटीएम चार्जमध्ये यापुढे बदल होत आहे.

आरबीआयकडून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे महागणार आहे. 1 मे पासून हा बदल लागू होणार आहे. त्यानुसार, ठरवून दिलेल्या लिमिटनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आता 17 ऐवजी 19 रुपये चार्ज लागणार आहे. तसेच, बॅलेन्स चेक करण्याचा चार्ज देखील 7 रुपयांवरन 9 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, सध्या बँकांकडून दुसऱ्या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र, तीनपेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतो.

एटीएम चार्ज वाढवल्याने एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज फीस वाढविण्याची मागणी होत आहे. सध्या, त्याचे मेन्टेनन्स आणि ऑपरेशन खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढलेले आहेत.  त्यातच, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर ठेवण्यात आली आहे. त्यास, आरबीआयने ग्रीन सिग्नल दिला आहे.

डिजिटल व्यवहार करणे फायदेशीर

एटीएम व्यवहारांवरील चार्ज वाढवल्याने आता त्या बँकांवर अधिक परिणाण होणार आहे, ज्या एटीएम सर्व्हिससाठी दुसऱ्या बँकांवर अवलंबून आहेत. ग्राहकांना आता  नॉन होम बँक एमटीएमधून पैसे काढण्यासाठी किंवा पुन्हा बॅलेन्स चेक करण्यासाठी अधिकचा चार्ज द्यावा लागणार आहे. दरम्यान, एटीएम सेवा दरात झालेली वाढ लक्षात घेता ग्राहकांनी आता ज्या बँकांचे एटीएम वापरतो, त्याच बँकांच्या एटीएममधून पैसे काढावे किंवा युपीआय पेमेंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास एटीएम चार्जपासून सुटका करुन घेता येईल.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या ‘प्रतिसाद’नंतर राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना सूचना; म्हणाले, संवेदनशील विषयावर…

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.