वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या निरज चोप्रा क्लासीक भालाफेक स्पर्धा सुरूवातीला पंचकुलामध्ये घेण्याचे निश्चित केले होते. पण आता काही तांत्रिक अडचणींमुळे सदर स्पर्धा 24 मे रोजी बेंगळूरमध्ये घेण्यात येणार आहे.
पंचकुलामध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या ठिकाणी पुरेशा प्रकाशझोताची सोय नसल्याने आयोजकांनी या स्पर्धेचे ठिकाणी बदलण्याचा निर्णय घेतला. बेंगळूरच्या शौकीनांना देशात पहिल्यांदाच होणाऱ्या निरज चोप्रा क्लासीक भालाफेक स्पर्धा म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये ग्रेनेडाचा जागतिक दर्जाचा भालाफेकधारक दोनवेळा विश्व विजेतेपद मिळविणारा अॅन्डर्सन पीटर्स, 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोलेर यांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा पाकचा भालाफेक धारक अर्षद नदीमला या स्पर्धेतील निमंत्रित करण्यात येणार किंवा नाही हे समजू शकले नाही. भविष्यकाळात डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धा भारतात भरविण्यासाठी निरज चोप्राचे जोरदार प्रयत्न चालु आहेत.