पाणी पिणे हे तर रोजचंच काम आहे, उन्हाळ्याच्या दिवसात आपले शरीर हायड्रेट राहावे यासाठी आपल्याला जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशातच रिकाम्या पोटी पाणी पिणे हे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळी कोमट पाणी किंवा साध पाणी पिणे आरोग्यास लाभदायक ठरते. पण जर तुम्ही उन्हाळ्यात रिकाम्या पोटी पाणी पीत असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या. आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी पाणी प्यावे कारण आपण रात्रभर डिहायड्रेटेड राहतो. पण तुम्ही कोणत्या प्रकारचे पाणी पीत आहात किंवा ते कोणत्या पद्धतीने पीत आहात याची काळजी घेतली पाहिजे? या दोन गोष्टींची विशेष काळजी घ्या.
रात्रभराच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर तुम्ही जर काही न खाता सर्वात आधी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुम्हाला आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण तुम्हाला कधीकधी पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पोट फुगणे आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. पण पाणी पिण्यापूर्वी त्याच्या तापमानाची विशेष काळजी घ्या. अशातच आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की रिकाम्या पोटी पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी…
रिकाम्या पोटी या प्रकारचे पाणी प्या
जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पाणी प्याल तेव्हा ते खूप थंड किंवा खूप गरम नसावे. साधं नॉर्मल पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. कारण पाण्याचा तुमच्या आतड्यांवर थेट परिणाम होतो. पाणी पिण्यामुळे तुमच्या शरीरातील घाण देखील निघून जाते. जास्त थंड पाणी पिल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो.
पचन खराब असू शकते
एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भरपूर पाणी प्यायलाने तुम्हाला वाटत असेल की त्यामुळे पचनक्रिया सुधारेल, तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की असे केल्याने वाईट परिणाम होतात. कारण रिकाम्या पोटी जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, कमी प्रमाणात पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.
पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही या प्रकारची पेये देखील पिऊ शकता
पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा फळांचा रस देखील पिऊ शकता. हे तुम्हाला दीर्घकाळ हायड्रेट ठेवू शकते. यातून तुम्हाला खूप फायदा होईल. कारण पाणी हे तुमच्या शरीरातील घाण काढून टाकते.
शिरा मोकळ्या होतात
रिकाम्या पोटी कधीही थंड पाणी पिऊ नका कारण यामुळे तुमच्या शिरा आकुंचन पावू शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही पाणी प्याल तेव्हा फक्त सामान्य किंवा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तसेच, पाणी प्यायल्याने तुमची त्वचा, शरीर, केस, सर्वकाही निरोगी राहते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)