आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात अक्षर पटेल हा दिल्लीचं तर ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करत आहे. दोन्ही संघांची ही या मोसमातील साखळी फेरीत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ ठरली आहे. दिल्ली आणि लखनौ 24 मार्चनंतर पु्न्हा एकमेकांसमोर आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीने टॉस जिंकला. दिल्लीची लखनौविरुद्ध सलग टॉस जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. कर्णधार अक्षर पटेल याने लखनौविरुद्ध पुन्हा फिल्डिंग करण्याचाच निर्णय घेतला आहे. अक्षरने 24 मार्चलाही लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं होतं.
दिल्ली कॅपिट्ल्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. दिल्लीने दुश्मंता चमीरा याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर मोहित शर्मा या सामन्यात खेळणार नाहीय. तर दुसऱ्या बाजूला लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रिन्स यादव.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमी आणि, मुकेश कुमार.