पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. सौदीत मोदींना रॉयल सौदी हवाई दलाच्या F15 विमानांद्वारे संरक्षण देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि सौदी अरबमधील वाढत्या संबंधावर एक पोस्टमध्ये चर्चा केली आहे. त्यांनी सौदी अरबला विश्वासू मित्र आणि रणनीतिक सहकारी म्हटलं आहे. 2019 मध्ये रणनितीक भागीदारी परिषदेच्या स्थापनेनंतर द्विपक्षीय संबंधाच्या विस्तारावर जोर देण्यात आला होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पीएम मोदींनी एका पोस्टमध्ये क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान हिंज रॉयल हायनेस प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या आमंत्रणावर सौदी अरेबियाच्या दोन दिवसाच्या राजकीय दौऱ्याची माहिती दिली होती. मोदी या दोन दिवसाच्या आखाती देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही देशात संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि लोकांमधील संबंधाच्या क्षेत्रात दोन्ही देशांनी लाभ आणि मजबूत भागिदारी विकसित केली आहे, असं मोदींनी म्हटलं होतं.
मोदी यांचं जेद्दाहमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. येथील एका स्थानिक भारतीय नागरिकाने ऐ वतन… मेरे वतन… ऐ वतन… आबाद रहे तू… हे गाणं पंतप्रधानांसमोर म्हणून त्यांचं स्वागत केलं. त्याआधी सौदी रॉयल एअरफोर्सच्या F-15 लढाऊ विमानांनी मोदींना हवाई एस्कॉर्ट प्रदान केलं. त्यानंतर एअरपोर्टवर मोदींना 21 तोफांची सलामी दिली. यातून भारत आणि सौदीतील मित्रत्वाचं घनिष्ट नातं दर्शवतं. मोदींचा हा सौदीतील तिसरा दौरा आहे. 2016 मध्ये मोदींना सौदी अरबने सर्वोच्च सन्मानही दिला होता.
अरब न्यूजच्या नुसार, भारत आणि सौदी अरेबिया एक साथ पुढे जाणार आहेत. शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी, केवळ आपल्या लोकांसाठी नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांसाठी मिळून काम करू, असं मोदींनी म्हटलं आहे.
सौदी अरब संरक्षण बाजारात ग्लोबल डाटाच्या माहितीनुसार, किंगडम मध्य पूर्व क्षेत्रात बोइंग निर्मित संरक्षण प्लॅटफॉर्मच्या सर्वात मोठ्या ऑपरेटरांपैकी एक आहे. त्याच्या रॉयल एअर फोर्सकडे 207 F-15 SA आणि 62 F-15 ईगल जेट फायटर्स सर्व्हिसमध्ये आहे. पीएम मोदी 22 आणि 23 एप्रिल रोजी सौदी अरेबियात विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.