मायलेज 19.46 किमी, किंमत 8.09 लाखांपासून, ‘या’ कारचे फीचर्स जाणून घ्या
GH News April 22, 2025 05:15 PM

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला अशा वाहनाबद्दल सांगतो जे केवळ उत्तम फीचर्ससह येत नाही तर उत्तम मायलेज देखील देते. मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदाई ऑरा आणि टाटा टिगोरला टक्कर देण्यासाठी होंडा अमेझ लाँच करण्यात आली होती. या कारमध्ये होंडा सेन्सिंग एडीएएस फीचर्स, 6 एअरबॅग्स, व्हेइकल स्टेबिलिटी असिस्ट, 3 पॉईंट्स ईएलआर सेफ्टी सीट बेल्ट असे 28 पेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

ही कार आल्यापासून ही सेडान बाजारात धुमाकूळ घालत आहे, या कारची किंमत किती आहे, ही कार किती मायलेज देते आणि या कारमध्ये कोणते सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत? चला जाणून घेऊया.

मजबूत इंजिन

होंडा कंपनीकडे 1199 सीसीचे 1.2 लीटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 89 बीएचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनसह येणाऱ्या या कारमध्ये तुम्हाला एक लीटरमध्ये किती मायलेज मिळेल? चला जाणून घेऊया. ही गाडी सध्या डिझेल पर्यायात उपलब्ध नाही.

होंडा अमेज मायलेज

होंडा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर मायलेजशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सेडानमुळे ग्राहकांना एक लिटर पेट्रोलमध्ये 19.46 किमीपर्यंत मायलेज मिळते. मायलेज अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ड्रायव्हिंग स्टाईल, मेंटेनन्स इत्यादी.

सुरक्षा फीचर्स

होंडाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या कारमध्ये होंडा सेन्सिंग एडीएएस फीचर्स, 6 एअरबॅग्स, व्हेइकल स्टेबिलिटी असिस्ट, 3 पॉईंट्स ईएलआर सेफ्टी सीट बेल्ट असे 28 पेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

भारतात होंडा अमेझची किंमत किती?

416 लीटर बूट स्पेससह येणाऱ्या या सेडानची किंमत 8,09,900 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, ही किंमत या कारच्या बेस व्हेरियंटची आहे. पण जर तुम्हाला या कारचे टॉप व्हेरिएंट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 11 लाख 19 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. होंडा कंपनीची ही कार ह्युंदाई ऑरा, टाटा मोटर्सची टिगोर आणि मारुती सुझुकी डिझायर सारख्या वाहनांशी स्पर्धा करते. या सेडानमुळे ग्राहकांना एक लिटर पेट्रोलमध्ये 19.46 किमीपर्यंत मायलेज मिळते. मायलेज अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ड्रायव्हिंग स्टाईल, मेंटेनन्स इत्यादी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.