Harshvardhan Sapkal makes serious allegations that Maharashtra is thirsty due to corruption in the Jal Jeevan Yojana
Marathi April 22, 2025 02:25 PM


जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Harshvardhan Sapkal makes serious allegations that Maharashtra is thirsty due to corruption in the Jal Jeevan Yojana)

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील पाणीटंचाईवरून सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी सरकारची स्थिती आहे. घोषणा मोठमोठ्या होतात, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. “हर घर नल” आणि “हर नल जल” असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. यासाठी केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशन योजना सुरू केली, पण केंद्रीय अर्थमंत्रालयानेच भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून एका नळाचा खर्च 30 हजारांवरून 1 लाख 37 हजारांवर कसा गेला? याचे स्पष्टीकरण मागवले असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.

हेही वाचा – Ajit Pawar : बैठकीला काका-पुतणे अडीच तास एकमेकांच्या शेजारी; अजितदादा म्हणाले, परिवार म्हणून एकत्र येणं…

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या योजनेचा फायदा फक्त अधिकारी आणि कंत्रादारांनाच झाला आहे. परंतु माता भगिणींना पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक मुलगी पाणी आणण्यासाठी जात असताना तिचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागते. यावरून जलजीवन मिशन भ्रष्टाचाराची बळी ठरली आहे, हे स्पष्ट होते. आता तर केंद्र सरकारने या योजनेच्या निधीत 47 टक्के कपात केली आहे. अशा परिस्थीत निधीअभावी कामे होणार नाहीत. यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण पुढची काही वर्ष सुरुच राहणार आहे, अशी शक्यता हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Sanjay Raut : ट्रम्प तर मोदींचे मित्र मग अमेरिका बाहेरची कशी, गांधींच्या विधानावर आक्षेप घेणाऱ्यांना राऊतांचा सवाल


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.