पुणे : 1 रूपयांत पीकविमा ही योजना चांगलीच चर्चेत आली होती. कारण 1 रूपयांत पीकविमा या योजनेत घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे. 1 रूपये पीकविमा योजनेत खूप लोकांनी आम्हाला चूना लावला आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. दिशा कृषी उन्नतीची @2029 या कार्यक्रमांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते. (Ajit Pawar made a statement that many people have blamed us)
अजित पवार म्हणाले, “आम्ही 1 रूपयांत पीकविमा द्यायचे चालू केले होते. ती योजना अडचणीत आली आहे. त्या योजनेत खूप लोकांनी आम्हाला चूना लावला आहे. ही माहिती आम्ही काढली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्याचे आता काम करणार आहोत. धरणे झाली, तर आपल्याला पाणी मिळणार आहे. पाणी मिळाले तर शेती करता येणार आहे. हे सगळे एकमेकांवर अवलंबून असणारे चित्र आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – Ajit Pawar : बैठकीला काका-पुतणे अडीच तास एकमेकांच्या शेजारी; अजितदादा म्हणाले, परिवार म्हणून एकत्र येणं…
“जग झपाट्याने बदलत आहे. शेतीक्षेत्र सुद्धा बदलत आहे. बदलत्या काळानुसार शेतीला कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिकची जोड देणे ही गरज आहे. शाश्वत विकासासाठी शेतीत संशोधन होणे गरजेचे आहे. मात्र हवामान, आतंरराष्ट्रीय परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे आधीच आव्हानात्मक असलेल्या अनेक अडचणी कृषीक्षेत्रासमोर आहेत. त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. माझ्या शेतकऱ्यांच्या मनात ‘मी माझे जीवन संपवतोय,’ ‘मी आता संसार, मुला-बाळांना सोडून आत्महत्या करतोय,’ ही भावना अजिबात येता कामा नये. त्यापद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. तुम्ही खचू नका, नाउमेद होऊ नका, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे,” असे आवाहन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
हेही वाचा – Politics : मनसे भरवणार प्रतिपालिका सभागृह; आदित्य ठाकरेंसह इतर पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण