वृत्तसंस्था/ बिजापूर
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात एक जवान हुतात्मा झाला. मनोज पुजारी (26) असे या जवानाचे नाव आहे. रविवारी सकाळी तोयनार-फरसेगड मार्गावर रस्त्याच्या बांधकामाच्या सुरक्षेसाठी जवान तैनात असताना प्रेशर आयईडीवर पाय ठेवल्यानंतर स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तोयनारपासून सुमारे 4 किमी अंतरावर असलेल्या टोयनार पोलीस स्थानक हद्दीतील मोर्मेड जंगलात ही घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षा दलांकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. 19 व्या बटालियन सीएएफचे जवान मनोज पुजारी तोयनार फरसेगड रस्ता बांधकाम साईटवर सुरक्षा ड्युटीवर होता.