धावपळीच्या रोजच्या रूटीनमध्ये शांत झोप लागणे ही सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. अनेकजण निद्रानाशेच्या तक्रारींनी हैराण झाले आहेत. खरं तर, अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊन व्याधी सुरू होतात. त्यामुळेनिरोगी शरीरासाठी शांत झोप आणि तणाव फ्री असणे आवश्यक आहे. तुम्हालाही शांत झोप आणि तणाव फ्री राहण्यासाठी काय करावे हे सुचत नाही, मग ही बातमी शेवटपर्यत वाचा. शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना मालिश करणे फायदेशीर ठरू शकेल. पायांची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि तुम्हाला शांत झोप लागते. आज आपण जाणून घेऊयात, शांत झोप आणि तणाव फ्री राहण्यासाठी कोणत्या तेलाने तळव्यांची मालिश करावी,
ताण आणि निद्रानाशेच्या तक्रारींपासून सुटका होण्यासाठी दररोज झोपण्याआधी तीळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी. तीळातील ऍमिनो ऍसिड सेरोटोनिन हार्मोन वाढवण्यासाठी मदत करते. सेरोटोनिन हार्मोन आनंदी हार्मोन आहे, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि तुम्हाला शांत झोप लागते.
मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते. जर तुम्हाला पोटाच्या संबधित व्याधी असतील तर मोहरीचे तेल हलकं गरम करा आणि त्याने मालिश करा, फायदा होईल.
लव्हेंडर तेलामध्ये एंटी-बॅक्टेरियल, एंटी-सेप्टीक, एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. ताणतणावापासून आराम मिळण्यासाठी पायांच्या तळव्यांना लव्हेंडर तेलाने मालिश करणे फायद्याचे ठरेल.
मानसिक आजारापासून आराम हवा असल्यास खोबरेल तेलाने मालिश करावी.
ताण, चिंता यापासून सुटका होण्यासाठी दररोज रात्री झोपण्याआधी खोबरेल तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी.
बदाम तेलाने शांत झोप आणि तणाव फ्री राहण्यासाठी पायांच्या तळव्यांना मसाज करणे फायद्याचे ठरेल.
हेही पाहा –