10 हजार ते 1 लाख! मनमोहन सिंग सरकार ते मोदी सरकार, सोन्याच्या दरात कोणत्या वर्षी किती वाढ?
Marathi April 22, 2025 08:28 PM

सोन्याची किंमत: सध्या गुंतवणूकदारांसाठी सोने हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जात आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गोंधळाची स्थिती असूनही गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच आऐज (22 एप्रिल 2025) सोन्याची किंमत ऐतिहासिकदृष्ट्या 1 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे.  या महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या भावात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मनमोहन सिंग सरकार (Manmohan Singh Govt)  ते मोदी सरकार ( Modi government) या काळात सोन्याच्या दरात नेमकी किती वाढ झाली. याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? गेल्या 18 वर्षांचा विचार केला तर सोन्याच्या किमतीत आतापर्यंत सुमारे 90 हजार रुपयांची वाढ झाली आहे. 2007 ते 2025 या काळात सोन्याचे दर विक्रमी वाढले आहेत.

कोणत्या वर्षी सोन्याच्या दरात किती झाली वाढ?

वर्ष सोन्याचा दर (24 कॅरेट 10 ग्रॅम)
2007 10800
2008 12500
2009 14500
2010 18500
2011 26400
2012 31050
2013 29600
2014 28007
2015 26344
2016 28624
2017 29668
2018 31438
2019 35220
2020 48651
2021 48720
2022 52670
2023 65330
2024 77560
2025 100000

सोन्याच्या दरात वाढ होण्याचं कारण काय?

सोन्याच्या वाढत्या किमतीची कारणे पाहिल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे सध्या प्रचंड गोंधळ उडाला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू आहे. दोन आर्थिक महासत्तांमधील हे व्यापारयुद्ध आणि डॉलरचे मूल्य घसरल्याने गुंतवणूकदारांना सोन्यावर अवलंबून राहावे लागले आहे.

बाजारातील अनिश्चिततेशिवाय अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी मंदीचा धोकाही निर्माण झाला आहे. अमेरिकेत मंदी आली तर त्याचा परिणाम जगभर जाणवेल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी शुल्काची घोषणा केल्यापासून जगभरातील शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. तथापि, ट्रम्प यांनी 90 दिवसांसाठी टॅरिफवर ब्रेक लावल्यानंतर बाजार सावरत आहे. तथापि, सोन्याच्या वाढत्या किमतीचे एक कारण म्हणजे भारतात लग्नाचा हंगाम आहे, ज्या दरम्यान त्याची मागणी आणखी वाढते.

महत्वाच्या बातम्या:

Gold Price Today: सोनं आणखी महागणार, अक्षय्य तृतीयेला सोनं 1 लाखांवर जाणार? तज्ज्ञांचं मत काय?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.