Maharashtra News Live Updates : माजलगावचे ढाबाचालक महादेव गायकवाड खून प्रकरणातील तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Saam TV April 22, 2025 08:45 PM
चोंडी या ठिकाणी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीसाठी दीडशे कोटी रुपये खर्च

लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर २१०० रुपये देऊ म्हणून फसवलं त्यानंतर १५०० रुपयेही देत नाहीत. वेळेवर लाखो महिलांची नावे या यादीतून काढून फेकून दिली. लाडका भाऊ योजना कुठे आहे? बेरोजगार युवकांना स्टायपेंडचे काय झाले? कंत्राटदारारांनी कामे केली त्याचे ९० हजार कोटी थकवले. पैसे नाहीत म्हणून शाळा बंद करण्याची जणू योजनाच सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्याा स्काॅलरशीपला पैसे नाहीत.पण दोन तासांच्या बैठकीसाठी १५० कोटी रुपये उधळतात. सरकार जनतेची फसवणूक करत असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनील माने यांनी केली आहे. अशा बेजबाबदार सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

माजलगावचे ढाबाचालक महादेव गायकवाड खून प्रकरणातील तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आज सकाळीच तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी केले होते रवाना.

प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे (सर्व रा. आनंदगाव) यांचा समावेश.

मंगळवारी पहाटे आळंदी (पुणे) येथून तीनही आरोपी घेतले ताब्यात.

बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची कारवाई.

साक्षी कांबळेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नीलम गोरे दाखल

छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलेल्या साक्षी कांबळेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नीलम गोरे दाखल

साक्षी कांबळे च्या आईने दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले होते पत्र.

कालच कांबळे कुटुंबांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला होता

साक्षीच्या आईची भेट घेऊन नीलम गोरे यांच्याकडून कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन

पुण्यातील पाषाण भागात धक्कादायक प्रकार, पती-पत्नीला मारहाण

पुण्यातील पाषाण भागात धक्कादायक प्रकार

दारूच्या नशेत पाच जणांच्या टोळक्याकडून पती पत्नीला मारहाण

हॉर्न का वाजवला म्हणून पाषाण सर्कल येथे दामत्याला पाच जणांकडून मारहाण

आरोपींकडून पती-पत्नीला धमकवल्याचा देखील प्रकार

पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

तर तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक

भाजपच्या नूतन पदाधिकारी निवडी विरोधात श्रीरामपूरात बॅनर बाजी...

बॅनरबाजीतून नूतन पदाधिकारी निवडीवर आक्षेप...

अज्ञातांनी एक श्रीरामपूरकर नावाने शहरभर अनोखी बॅनरबाजी करत दर्शवला विरोध...

फॉर्च्युनर आणि पैसे असेल तर सर्व नियम शिथिल करत भाजप अध्यक्ष होता येईल...

दूध भेसळीचे गुन्हे आणि काँग्रेसचा DNA असला तर अध्यक्ष होता येईल...

अध्यक्ष होण्यासाठी भाजप सदस्य नसला तरी चालेल मात्र पैसे आणि फॉर्च्युनर हावी...

झन झन कि सुनो झणकार ए पैसा बोलता है...

असे डायलॉग असलेले बॅनर बनले चर्चेचा विषय...

बीड अंबाजोगाईत तहसील कार्यालयाच्या परीसरात असलेल्या टॉवरवर चढून तीन तास आंदोलन

जवळगाव येथील गायरान प्रश्नी आंदोलन

अचानक केलेल्या आंदोलनाने प्रशासनाची दमछाक

जवळगाव येथील गायरान जमिनीत होणार सौरऊर्जा प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याची मागणी

नवनाथ हारे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून केले तीन तास आंदोलन

सौरऊर्जा प्रकल्प इतर ठिकाणी नाही हालवल्यास सम विचारी संघटना जाऊन उद्या पझेशन ताब्यात घेण्याचा इशारा

ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज निघणार

रत्नागिरी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरवात झाली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर आज ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत निघणार आहे. जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार आहे.

शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र; बैठकीसाठी झाली भेट

शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आलेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मीटिंगसाठी शरद पवार सुनेत्रा पवार युगेंद्र पवार आणि इतर विश्वस्त यांची विद्या प्रतिष्ठान येथे बैठक सुरू आहे. ज्यावेळेस बैठकीसाठी सुनेत्रा पवार पोहोचल्या त्या आधीच युगेंद्र पवार विद्या प्रतिष्ठान मध्ये पोहोचले होते.सुनेत्रा पवार येताच युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले. आज युगेंद्र पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काकींचे आशीर्वाद युगेंद्र पवारांनी घेतले.

शंभर रुपयाचा स्टॅम्प मिळत नसल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना घ्यावा लागतोय पाचशेचा स्टॅम्प....

नंदुरबार जिल्ह्यात शंभर रुपयाचा स्टॅम्प मिळत नसल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना पाचशेचा स्टॅम्प खरेदी करावा लागत असल्याने, आर्थिक भुरंदड सोसावा लागत आहे. गेल्या आठवड्या भरापासून हिच परिस्थीती असून, सलगच्या आलेल्या सुट्या आणि वारंवार ग्रामीण भागातून पदरमोड करुन भाडेतोडे खर्चुन शासकीय कामांसाठी आवश्यक असलेला शंभर रुपयांचा स्टॅम्पच मिळत नसल्याने, नाईलाजास्तव त्यांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पची खरेदी करावी लागत आहे,

पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पिंपरी चौकातील महामार्गावरील ग्रेड सेपरेटर या ठिकाणी एक मोठा मालवाहतूक करणारा कंटेनर अडकल्याने

पहाटे पासून ही वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहतूक कोडी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाहतूक पोलिस प्रशासनाने वेळीच दखल घेत सदर कंटनेरच्या टायर मधील हवा कमी करून कंटेनर आणि बोगद्याची उंची समतोल करत सदर कंटेनर सकाळी दहा वाजता दरम्यान बाहेर काढून वाहतूक कोंडी कमी केली आहे.

yeola-ट्रक चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

नगर मनमाड महामार्गावर येवल्या जवळील असलेल्या राजस्थान ढाबा परिसरामध्ये विश्रांतीसाठी थांबलेल्या एका परप्रांतीय ट्रक चालकाने आपल्याच ट्रॅकच्या केबिनमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या मागील कारण अद्याप अस्पष्ट असून चालकाची ओळख पटेल असा कोणताही पुरावा त्याच्या जवळ नसल्याने चर्चांना उधाण आले आहे दरम्यान याबाबत शहर. पोलीस अधिक तपास करत आहेत

पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीवर बसणाऱ्या त्या पोलीस शिपायाची बदली

पोलीस ठाण्यात थेट पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीवर पोलीस कर्मचारी बसल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता.

प्रवीण पाडाळे असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांची आता बदली करण्यात आली आहे.

तुझ्या शिपाई पाडाळे यांची आता बंडगार्डन पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

पुणे पोलिस मुख्यालयाच्या उपायुक्त डॉ संदीप भाजीभाकरे यांनी दिले बदलीचे आदेश.

इतकचं नाही तर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बाणेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ जगताप यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे.

जगताप यांची कोंढवा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून बदली करण्यात आली आहे.

काल एकाच दिवशी बाणेर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी तसेच दोन अधिकाऱ्यांची बदली.

दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव; 14 नगरसेवकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास ठरावाचे निवेदन

माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर अमृत पोळ यांच्यावर 14 नगरसेवकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. नगराध्यक्ष सागर पोळ हे कोणत्याही नगरसेवकाला विचारात न घेता मनमानी कारभार करत असून वेळेवर मीटिंग न घेणे.. बँकेचे आर्थिक व्यवहार परस्पर दुसऱ्या बँकेत करणे याबाबत शासनाच्या नगर विकास खात्यामार्फत काढण्यात आलेल्या नवीन अध्यादेशानुसार दहिवडी नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी एकत्र येऊन हा अविश्वास ठराव दाखल केला आहे याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही दिली असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक महेश जाधव यांनी दिली आहे.

पाण्याची बाटली दिली नाही म्हणून मारहाण

छत्रपती संभाजीनगरमध्ये थंड पाण्याची बाटली दिली नाही म्हणून एकाला टोळक्याकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरात आईस्क्रीमच्या दुकानावर थंड पाण्याची बाटली दिली नाही म्हणून एका टोळक्याने आईस्क्रीम विक्रेत्याला बेदम मारहाण केली आहे. उन्हाळा असल्यामुळे थंड पाण्याची बाटली का दिली नाही म्हणून दुकानदाराशी एका टोळक यांना वाद घातला त्यावेळेस दुकानदाराने माझ्याकडे पाहणे हेच असल्याचे सांगितल्याने संतापलेल्या टोळक्याने मारहाण केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉररूममधून घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेचा वॉररूममधून घेतला आढावा घेतला.नवीन पाणीपुरवठा योजनेची २५०० मि.मी.ची जलवाहिनी सुमारे ३४ कि.मी.पर्यंत छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याखाली दबली आहे. त्यामुळे चौपदरी रस्त्याची १० मीटर जागा ७००, ९००, १२०० व नवीन २५०० मि.मी.च्या जलवाहिनीसाठी सोडावी लागणार आहे. रस्त्याची एक बाजू वाढविण्यासाठी ३०७ कोटींतून भूसंपादन आणि २०० कोटी रुपये नवीन रस्त्याचा खर्च मिळून ५०७ कोटींचा खर्च तरतूद करण्यास विलंब होणार असल्याने १५.१९ कोटींतून तात्पुरते बॅरिकेडिंगचे काम करून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. या योजनेचे काम लवकर पूर्ण करून शहरवासीयांना लवकर मुबलक पाणी मिळवून द्या. पैठण रस्त्याखाली गेलेली मुख्य जलवाहिनी सुरक्षित करण्यासाठी अल्प मुदती मुदतीच्या उपाययोजना करा, त्यासाठी १५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील निवडक विकास योजनांच्या कामांचा आढावा त्यांनी मुंबईतील वॉररूममधून घेतला. यात शहराच्या २,७४० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचाही समावेश होता.

मुंब्रा बायपासजवळ अपघात, एकाचा मृत्यू

ठाण्यातील मुंब्रा बायपास या ठिकाणी एका चारचाकी वाहन चालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंब्रा येथून नवी मुंबई येथील महापा या ठिकाणी जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पुढे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला धडक दिली . त्यात चारचाकी वाहन पुढे जाणार्या कंटेनर खाली अडकले यात चारचाकी वाहनात असलेल्या विष्णु पाल याचा अपघात झाला त्याला कळवा रुग्णालयात दाखल केले असताना त्याला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.

मराठवाड्यात पुढील १० दिवस होरपळ, आयएमडीचा इशारा

छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यात उष्ण लाटांमुळे पुढचे 10 दिवस होरपळ होणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिवसाला एक अंशाने तापमानात वाढ होत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सुमारे 6 दिवस तापमान वाढते राहिल्यामुळे उष्णतेने कहर केला. पुढील 10 दिवसांत पारा चढणार असेल अशी शक्यता वर्तविण्यात येतेय. कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी 41.6 अंश सेल्सिअस कमाल तर 26.2 किमान तापमानाची नोंद झाली. 21 ते 30 एप्रिल दरम्यान तापमानवाढीचा विक्रम होईल, असे भाकीत हवामानतज्ज्ञ वर्तवत आहेत. कमाल तापमानात वाढ होत असल्याने दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा चटका कमी होत नाही. यंदाच्या उन्हाळ्यातील एप्रिल 'उष्ण' ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अनुभव येत आहे. रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा कमी होत असून गरम वाफा जाणवत आहेत.

मेळघाट मध्ये भीषण पाणीटंचाई ; मेळघाट मधील 30 गावांपर्यंत टँकरही पोहोचू शकत नाही

मेळघाटमधील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात आहेत. नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मेळघाट मध्ये विहिरीने तळ गाठला आहे, तर सार्वजनिक नळावर मोठी गर्दी उसळते,अमरावती जिल्ह्यात 56 पाणी प्रकल्प आहेत यात 46.29 टक्के जल साठा असून 28 प्रकल्प कोरडे पडले आहे, विहीरवर पाणी भरण्यासाठी तुफान अशी गर्दी दिसून येतं आहे, मेळघाट मध्ये पाण्याचे पूर्ण त्रोत आटले आहे, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो, तर मे महिन्यात आणखी परिस्थिती भीषण होते की काय हि भीती व्यक्त होतं आहे धक्कादायक म्हणजे मेळघाट मधील 30 गावात टँकरही जाऊ शकतं नाही इतका रस्ता खराब आहे

- नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा सिन्नर तालुक्यात

- तपासलेल्या १४४ नमुन्यांपैकी सिन्नर तालुक्यात आढळले सर्वाधिक १७ दूषित नमुने

- कृषिमंत्र्यांच्या तालुक्यातचा ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार, ग्रामस्थांचे आरोग्य संकटात

- जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांपैकी ७ तालुक्यात ६० ठिकाणी दूषित पाणी

- इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, मालेगाव, कळवण या तालुक्यातही पाणी दूषित

- ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत गुणवत्ता सर्वेक्षणात अनेक ग्रामपंचायती धोक्याच्या पातळीवर

केंद्राच्या धरसोड निर्यात धोरणाचा कांद्याला मोठा फटका

- कांदा निर्यातीत १०० टक्के घट, तब्बल ३७० कोटींचा फटका

- देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यातीवर लाभलेल्या निर्बंधामुळे निर्यात घटली

- केंद्राच्या अस्थिर धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच मोठं नुकसान

- कांदा निर्यातीअभावी परकीय चलनही शून्यावर

- कांद्याला कायमस्वरूपी शाश्वत जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा चाळीशी पार

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा चाळीशी पार झाला आहे. त्यामुळे लाहीलाही होत असताना सिद्धार्थ उद्यानातील वाघोबांना अंघोळ घातली जातेय. उद्यानामध्ये असलेल्या सर्व वाघोबांना सकाळी 11 वाजता त्यांचा दुपारी तीन वाजता अशी दोन वेळा थंड पाण्याची फवारे मारून आंघोळ घातली जात आहे. गेल्या सहा दिवसांपासून तापमान ४१ अंशांवर होते. सोमवारी त्यात किंचित घट होऊन ते ४०.९ अंश सेल्सियस नोंद झाली. मान्सूनपूर्व सूर्य आग ओकू लागला आहे. दुपारच्या सत्रात उन्हाच्या झळा अंग पोळून काढत आहेत. यामुळे शहरवासी, पर्यटक, आदी सर्वच हैराण झाले आहेत. दरम्यान, आज पारा ४० अंशांवर आहे. वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान सिद्धार्थ उद्यानातील वाघोबांना सोमवारी अशी अंघोळ घालण्यात आली.

Maharashtra News Live Updates : तापमानात अमरावती शहर देशात चौथ्या क्रमांकावर

सोमवारी अमरावती शहराचे तापमान हे 44.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले..

एप्रिल महिन्यातील सर्वात उच्चांक तापमान हे काल नोंदवल्या गेले..

पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज..

नागरिकांनी उन्हापासून काळजी घेण्याची प्रशासनाचे आव्हान...

धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा फुले योजना, आयुष्मान भारत योजना लागू करा

प्रसूतीदरम्यान महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाच्या सूचना

काय आहेत धर्मादाय रुग्णालयांना सूचना?

निर्धन रुग्ण निधी खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेऊन ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत करण्यात यावी

धर्मादाय रुग्णालयाने कोणत्याही रुग्णाकडून अवाजवी पद्धतीने अनामत रक्कम स्वीकारू नये

अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयामध्ये कुठल्याही रुग्णास उपचार नाकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमधील रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांवरील उपचाराचाही समावेश

पुणे महापालिकेची पावसाळ्यापूर्वी रस्त्यासाठी ६५ कोटीची निविदा

राज्य शासनाने २५ कोटीच्या आतील निविदा १५ दिवसात होणार असल्याने ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता

पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्याने पथ विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते

पाऊस सुरु असताना रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविण्याची कामे केली तरी त्याठिकाणी पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात होते

हवामान विभागाने यावर्षीही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे, त्यामुळे रस्त्यांची चाळण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पथ विभागाने आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे

उशीर टाळण्यासाठी महापालिकेनेही तातडीने या कामांसाठी शासनाच्या नव्या आदेशानुसार डीसीआरला मान्यता दिली आहे

तसेच पूर्वगणनपत्रक समितीच्या बैठकीत ही ६५ कोटीच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे निविदांची कामे वेगात होणार आहेत

कळंबमधील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामात दिरंगाई

धाराशिव च्या कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसराची सुशोभीकरणाचे काम शासकीय कार्यालयाच्या दिरंगाईमुळे रखडल्यामुळे शिवप्रेमीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने या कामासाठी मंजुरी दिली होती त्यानंतर जवळपास 40 लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर करून संबंधित यंत्रणेला सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाची वर्क ऑर्डर ही दिली.मात्र सुशोभीकरणाच्या कामाला परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा अडचण ठरत असल्याने हे सुशोभीकरणाचे काम रखडल्याची माहिती आहे.त्यामुळे अडसर ठरणारे अतिक्रमण काढुन या कामाला सुरूवात करावी अशी मागणी शिवप्रेमीतुन केली जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील सात गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा...

अमरावती जिल्ह्यातील 776 गावांसाठीच्या तातडीच्या उपायोजना 50% वरच...

मागील तीन दिवसांपासून अमरावतीच्या तापमानात वाढ पाणी टंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता..

चिखलदरा तालुक्यातील कोहना गावातील नागरिकांचे पाणी भरण्यासाठी जातात दिवसातले सहा तास...

पुणे महापालिका आयुक्तांनी दुचाकीवरून केली पुलाच्या कामाची पाहणी

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच या उड्डाणपुलावर दुचाकीवरून फेरी मारून पाहणी केली. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता असून, हा कार्यक्रम येत्या रविवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटर दरम्यान तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले. यातील राजाराम पूल चौकातील ६५० मिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी झाले. त्यानंतर आता २१२० मिटर लांबीचा विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.

चंद्रभागा स्वच्छतेसाठी स्किमर तंत्रज्ञान वापरणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा शुद्ध आणि स्वच्छ राहावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. प्रयागराजच्या धर्तीवर येत्या आषाढी वारीत चंद्रभागा स्वच्छतेसाठी स्किमर या नवा तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जाणार आहे.

प्रयागराज मध्ये कुंभमेळा दरम्यान गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी स्किमर तंत्रज्ञानाचा वापर केला होता. स्किमर तंत्रज्ञानामुळे नदीतील कपडे, प्लास्टिक पिशव्या, शेवाळ, प्लास्टिक बाटल्या यासह इतर वस्तू एकत्र जमा करून त्या नदीबाहेर काढल्या जातात. या शिवाय नदीतील पाणी स्वच्छ केले जाते. चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घाण असते. यासाठि प्रयागराजच्या धर्तीवर पंढरपुरात चंद्रभागा स्वच्छतेसाठी दोन स्किमर मशीन आणण्यात येणार आहेत. अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेसगळ्या पक्षांनी आणि कुटुंबांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.. मी मुख्यमंत्री यांना तीन महिन्यापासून विनंती करते महाराष्ट्रातील क्राईम,महिला अन्याय ,शेतकरी आत्महत्या असतील या सर्वांसाठी सर्वांनी एकत्र यावे.. मावळच्या शिरगाव मध्ये एका कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

मावळच्या प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव मधील अभिमान सोसायटी च्या एच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कामगाराने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सागर राजेंद्र पाटील वय 32 असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. सागर पाटील हे काही दिवसापूर्वीच सोसायटीमध्ये रेंटवर राहायला आले होते. दरम्यान अभिमान सोसायटी मधील एका आठवड्यातील दुसरी घटना आहे. पाटील शनिवारी कामावरून आल्यानंतर त्यांनी आत्महत्या करतेवेळी घरात फक्त एकटेच होते. तीन दिवसानंतर आजूबाजूला दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांनी शिरगाव परंदवाडी पोलिसांना कळविले पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी बॉडी तळेगाव रुग्णालयात पाठविण्यात आली आहे. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप कळू शकले नाही. अधिक तपास शिरगाव परंदवाडी पोलीस करीत आहे...

भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनवर जनआक्रोश मोर्चा

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री केली जात आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या निषेधार्थ लोणावळा पोलीस ठाण्यावर नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. लोणावळ्यात सर्रासपणे मटक्याचे दुकान चालू आहे. लोणावळ्यात गांजा, व्हाइटनर, एमडीआर, पिताना विद्यार्थी दिसत आहे. आमदार साहेब लोणावळ्यात येतात आणि फक्त अनाधिकृत टपऱ्या, उड्डाणपूल, रस्ता या विषयी चर्चा होतो. आमदार साहेब हे तुम्हाला दिसत नाही का . करता तरी काय. लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सर्रास विक्री केल्या जाते. आपण गप्प का आहात असा सवाल नागरिकांनी विचारलेला आहे

पुण्यातील माता मृत्यू प्रकरण चौकशी अहवालात ‘ससून’ चा हलगर्जीपणा?

पुणे पोलिसांनी अहवालावर चार मुद्द्यांवर अभिप्राय मागितल्यानंतर ससून ने दिला सुधारित अहवाल

तनिषा भिसे प्रकरणात दिनानाथ आणि डॉ. सुश्रृत घैसास यांना क्लीन चीट देणारे ससून रुग्णालय यांचा हा हलगर्जीपणा का की तो मुद्दाम केला गेला? असा प्रश्न उपस्थित

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांनी उपस्थित केलेले मुद्दे कुठले

हाय रिस्क स्थिती असूनही उपचारात दिरंगाई?

रुग्णाची प्रकृती गंभीर असूनही, डॉ. घैसास यांनी तात्काळ उपचार न करता वेळ दवडल्याने परिस्थिती अधिक बिघडली का?

पाच तासांहून अधिक वेळ उपचाराशिवाय?

रुग्णाला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्यावर पाच तासांपेक्षा अधिक वेळ ओपीडीच्या अॅसेसमेंट रूममध्ये ठेवण्यात आले, मात्र कोणतेही वैद्यकीय हस्तक्षेप न केल्याने रुग्णाने तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला का?

पुण्यातील गुन्हेगारांच्या घरांचे ‘गुगल मॅपिंग’

पुणे शहरात वाढत्या "स्ट्रीट क्राईमवर" नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आखली महत्त्वाची योजना

गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे ‘गुगल मॅपिंग’

पहिल्या टप्प्यात चार हजार रेकॉर्डवरील गुंडांवर कारवाई करण्यात येणार

रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मारहाण, वाहन तोडफोड, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर

एकूण ३७ हजार ४०८ गुन्हेगारांची कुंडली तयार असून यातील चार हजार गुन्हेगार ‘हाय रिस्क’ श्रेणीत

स्वारगेट लैगिंक अत्याचार खटल्यासाठी नाशिकचे ॲड अजय मिसर यांची नियुक्ती

पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड मधील तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड अजय मिसर यांची नियुक्ती

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात ९२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे

याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे

पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याची २ दिवसांची पोलिस कोठडी चे हक्क अबाधित ठेवले आहेत

Maharashtra News Live Updates : डॉक्टर सुश्रुत घैसास यांना आय एम ए चा पाठिंबा! घैसास यांच्यावर चुकीचा गुन्हा

इंडियन मेडिकल असोसिएशन कडून आज डॉ सुश्रुत घैसास यांना पाठिंबा देण्यात आला आहे. डॉ घैसास यांना आम्ही कायदेशीर मदत देणार आहोत तसेच आम्ही कायदेशीर तज्ञांशी बोलणे झाले आहे. डॉ घैसास यांनी सत्य परिस्थिती आम्हाला सांगितली आहे, त्यांनी स्वतःसाठी पैसे घेतले नव्हते ते सगळे पैसे रुग्णालयालाच जाणार होते असे स्पष्ट मत आय एम ए चे अध्यक्ष डॉ सुनील इंगळे यांनी मांडले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.