एकनाथ शिंदेंचा चेहऱ्यामुळेच मतदान मिळालं, मंत्री अतुल सावेंना शिंदेंच्या आमदाराचं प्रत्युत्तर
Marathi April 22, 2025 10:36 PM

नांदेड : आमच्याकडे 237 आमदार आहेत, ज्यांना जायचे त्यांनी जावं, आणि  ज्यांना राहायचंय त्यांनी राहावं असं वक्तव्य मंत्री अतुल सावे यांनी नांदेडमध्ये केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर हदगाव हिमायतनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (MLA Baburao Kadam Kohlikar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत कोणी राहायचं आणि कोणी जायचं याचा अधिकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांना नेमका कोणी दिला? असा सवाल कदम यांनी केला. महायुतीची वरील स्तरावर कमिटी आहे. ते कोणी काहीच बोलत नाही असे बाबुराव कदम म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळं महायुतीला भरघोस यश मिळालं

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 237 जागा मिळाल्या, याच आत्मपरिक्षण मंत्री अतुल सावे यांनी केले पाहिजे. हे सगळं श्रेय कोणत्या चेहऱ्यामुळं मिळालं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करुन विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळालं आणि 237 आमदार महायुतीचे निवडून आल्याचे कदम म्हणाले. याचा मंत्री अतुल सावे यांना विसर पडला काय? असा सवाल देखील कदम यांनी यावेळी उपस्थित केला.

अतुल सावेंनी माझ्या अनेक प्रस्तावांना मुंजरी दिली नाही

मी आमदार म्हणून जरी नवखा असलो तरी परंतू 25 वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये काम करतोय. 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो. चेअरमन होतो असे आमदार बाबुराव कदम म्हणाले. मी ग्रामपंचायतचा सरपंच होतो. तांडा वस्तीचा प्रस्ताव कसा सादर करायचा हे सांगण्याइतपत मी इतका छोटा नाही. गेल्या वेळी मंत्री असताना अतुल सावेंनी माझ्या अनेक प्रस्तावांना मुंजरी दिली नसल्याचेही कदम म्हणाले. आताही माझ्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली नसल्याचे ते म्हणाले. महायुतीचे नांदडे जिल्ह्यात 9 आमदार आहेत. यापैकी 7 आमदारांनी त्यांच्या विरोधात तक्रारी करण्याच्या मार्गावर असल्याचे कदम म्हणाले. काही जणांनी तक्रारी केल्या असल्याचे कदम म्हणाले.

निधीवाटपावरुन अंतर्गत धुसफुस

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये निधीवाटपावरुन अंतर्गत धुसफुस असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांन निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तांडा वस्तीचा निधी मिळावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करुनही अतुल सावे यांनी दिला नाही. हा निधी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिला. त्यामुळे अतुल सावे जिल्ह्यात दौऱ्यावर येतील तेव्हा विरोध करुन आंदोलन करेन, असा इशारा शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी दिला होता. तर मेघना बोर्डीकर यांनी अतुल सावे यांना पत्र लिहीत मंजूर केलेली काम रद्द करण्याची मागणी केली होती.

मंत्री महोदयांनी सत्तेचा आव आणू नये,  बहुमत शिंदे साहेबाच्या चेहऱ्यामुळेच

सुधाकरराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाच्या कारणावरून महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपात अनियमितता केल्याची आमदारांनी तक्रार केली होती. त्यावरुन मंत्री विरुद्ध आमदार असा संघर्ष निर्माण झाला आहे. तांडा वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत येतात. त्याला फक्त मी मंजूरी दिली. तक्रार करणाऱ्या आमदारांना प्रक्रिया माहीत नाही. त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला मंत्री अतुल सावे यांनी दिला होता. शिवाय नांदेड जिल्ह्यातील हदगावचे आमदार यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यावर देखील असुल सावे यांनी शिवसेना आमदाराला इशारा दिला आहे. आमच्याकडे 237 आमदार आहेत.  ज्यांना महायुतीत राहायच त्यांनी रहावं आणि ज्यांना नको त्यांनी बाहेर पडावं असं अतुल सावे म्हणाले होते. त्यांना शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही नवीन आमदार असतो तरी प्रशासकीय प्रक्रिया आम्हाला माहित आहे. 31 मार्चच्या तीन दिवसापूर्वी आलेले तांडा वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव कसे मंजूर केले? असा प्रश्न बाबुराव कदम यांनी विचारला.  कोणीही सत्तेचा आव आणू नये सत्तेचा माज करु नये असं उत्तर बाबुराव कदम यांनी मंत्री अतूल सावे यांना दीले. जे 237 आमदार निवडून आले ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आल्याचे कदम म्हणाले

https://www.youtube.com/watch?v=CPVJWVDQ91S

महत्वाच्या बातम्या:

Atul Save: मोठी बातमी : आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीत राहायचं ते राहा, अन्यथा जा! अतुल सावे यांचा शिंदेंच्या आमदाराला थेट इशारा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.