IPL 2025 स्पर्धेचा जेतेपद चेन्नई सुपर किंग्सला मिळणार! सीएसकेच्या सीईओने सांगितलं असं गणित
GH News April 23, 2025 12:07 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. अजूनही या स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्स आऊट झालेला नाही. सहा सामने शिल्लक असून दोन पराभवानंतर गाशा गुंडाळावा लागणार आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्स आहे. दुसरीकडे, चेपॉकमध्ये चेन्नईला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. पण यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभवाची धूळ चारली. त्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे फलंदाजीतही चेन्नई सुपर किंग्स कमकुवत झाली आहे. असं सर्व नकारात्मक वातावरण असताना चेन्नई सुपर किंग्सचे सीईो काशी विश्वनाथ यांनी एक धावा केला आहे. यंदाचं जेतेपद चेन्नई सुपर किंग्स मिळवणार असल्याचा दावा केला आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्स 2010 सारखा चमत्कार करेल असं त्यांनी सांगितलं आहे.

आयपीएल 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने पहिल्या सात सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला होता. त्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर सलग दोन सामने जिंकले होते. पण चेन्ई सुपर किंग्सने धोनीच्या नेतृत्वात सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण उर्वरित सात पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आणि संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला. सीएसकेने तिसरं स्थान गाठतं प्लेऑफमध्ये एन्ट्री घेतली होती. त्यानंतर चेन्नईने अंतिम फेरीत जागा मिळवली. अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी सामना झाला आणि सीएसकेने मुंबई इंडियन्सला 22 धावांनी पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं.

2025 आयपीएल स्पर्धेतही चेन्नई सुपर किंग्सची काहीशी अशीच स्थिती आहे. आतापर्यत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे पदरात फक्त 4 गुण आहे. त्यामुळे उर्वरित सहा सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. कारण सहा सामन्यात विजय मिळवला तरच पात्र होण्यासाठी 16 गुण होतील. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्ससाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. चेन्नईला दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.