Maharashtra Live Updates : मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू?
Sarkarnama April 22, 2025 11:45 PM
Rajendra Ghanwat wife Death : राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? दमानियांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

खूप खूप धक्कादायक ! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे घनवट यांच्या पत्नी मनाली यांचा मृत्यूवर संशय उपस्थित केला जात आहे.

Ajit Pawar : पीकविमा योजनेत आम्हाला अनेकांनी चुना लावला - अजित पवार

"आम्ही मागे एक रुपयांत पीकविमा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, ती योजना अडचणीत आली. खूप लोकांनी आम्हाला चुना लावला. आम्ही आता तुमच्या भल्याचं असेल, ते करणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नव्याने ही योजना आणली जाईल. यासाठी जुन्या योजनेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काही बदल केले जातील", असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Buldhana : शेगावमधील नखं आणि केस गळणाऱ्या गावात केंद्र सरकारचं पथक दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात केस गळती नंतर त्याच रुग्णांना आता नख गळती सुरू झाली आहे. या गंभीर प्रकाराची आता केंद्र सरकारने दखल घेतली आहे. यासाठी रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी तात्काळ एक पथक नेमले असून हे पथक आज संबंधित गावांचा दौरा करणार आहे.

Zeeshan Siddiqui death threat : झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल द्वारे त्यांना धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची मागील वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांना देखील हत्येआधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता झिशान यांना धमकी आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताची पोलिसांचे पथक झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.