HCL Tech Dividend : भागधारकांसाठी ९०० टक्के लाभांश जाहीर, रेकॉर्ड तारीखही केली निश्चित
ET Marathi April 23, 2025 11:45 AM
मुंबई : देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत ४,३०७ कोटी रुपयचांचा निव्वळ नफा नोंदवला. नफ्यात वार्षिक आधारावर ८% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३,९८६ कोटी रुपये होता. लाभांश रेकॉर्ड तारीखतिमाही निकाल जाहीर करताना एचसीएलटेकने भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीने प्रति शेअर १८ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. लाभांशासाठी रेकॉर्ड तारीखही निश्चित करण्यात आली आहे. या अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख २८ एप्रिल २०२५ असेल, असे एचसीएल टेकने म्हटले आहे. एचसीएल टेकने असेही म्हटले की ९०० टक्के लाभांश ६ मे २०२५ रोजी दिला जाईल. कंपनीचा हा सलग ८९ वा तिमाही लाभांश आहे. या घोषणेसह एचसीएल टेकचा आर्थिक वर्ष २०२५ साठी एकूण लाभांश पेमेंट प्रति शेअर ६० रुपयांवर पोहोचला आहे. ऑपरेटिंग उत्पन्नया तिमाहीत एचसीएलटेकचे ऑपरेटिंग उत्पन्न ६% वाढून ३०,२४६ कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ते २८,४९९ कोटी रुपये होते. मात्र, हा तिमाही कंपनीसाठी हंगामीदृष्ट्या कमकुवत मानला जातो. याचा परिणाम उत्पादन विभागातील कमकुवतपणा आणि मार्जिन दबावाच्या स्वरूपात दिसून आला. आर्थिक वर्षातील कामगिरीसंपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न ६.५% वाढून १,१७,०५५ कोटी रुपये झाले, जे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १,०९,९१३ कोटी रुपये होते. संपूर्ण वर्षासाठी निव्वळ नफा १०.८% ने वाढून १७,३९० कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ते १५,७०२ कोटी रुपये होते. कंपनीच्या १८-१९% च्या मार्गदर्शनानुसार EBIT मार्जिन १८.३% वर स्थिर राहिले. शेअर्सची कामगिरीनिकाल जाहीर होण्यापूर्वी बीएसईवर एचसीएलटेकचे शेअर्स ०.२६% वाढून १,४८६ रुपयां बंद झाले. या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये आतापर्यंत एचसीएलटेकने २२.२८% नकारात्मक परतावा दिला आहे. मात्र, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्स ५.२६% ने वाढले आहेत. एचसीएलटेकचे मार्केट कॅप ४.०१ लाख कोटी रुपये आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.