जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आंदोलन केले. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून संताप व्यक्त केला. मनसेने या हल्ल्यात बळी पडलेल्या 26 जणांना, ज्यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले
Nashik Live: नाशिकचे पर्यटक सुखरूप, पण काश्मीरमधील पर्यटनावर संकटनाशिकचे ४० ते ५० पर्यटक सध्या काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती नाशिकच्या ब्रिजमोहन ट्रॅव्हल्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली आहे. यापैकी नाशिकच्या इंदिरानगरमधील चव्हाण कुटुंबातील चार जण पहलगाम येथे गेले होते आणि ते सुखरूप असून परतीच्या मार्गावर आहेत. मे महिन्यासाठी अनेक पर्यटकांनी काश्मीरचे बुकिंग केले असले तरी, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे अनेकांनी केलेली बुकिंग रद्द होण्याची शक्यता चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
Pahalgam Terror Attack Live Update: भाजप नेत्यांसह विविध हिंदू संघटनांच्या सदस्यांचा जम्मूमध्ये पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेधजम्मूमध्ये पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध भाजप नेत्यांसह विविध हिंदू संघटनांचे सदस्य करत आहेत.
Pahalgam Terror Attack Live Update: पहलगाम दहशतवादी घटनेला खूप गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे'- गुलाम अहमद मीरपहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर म्हणतात, "गेल्या काही वर्षांपासून असे म्हटले जात होते की दहशतवादावर कडक कारवाई करण्यात आली आहे....त्यामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. या समस्येला खूप गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे."
J&K Live : बैसरणमध्ये सुरक्षा दलाकडून दुसऱ्या दिवशीही पाहणीबैसरन खोऱ्यात आजही सुरक्षा दलांनी पाहणी केली. जिथे काल दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जखमी झाले होते.
J&K Live : बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नानभारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला असून जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
Pune Live : पुण्यातील 2 पर्यटकांचे पार्थिव विशेष विमानाने आणणारपहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर संध्याकाळी ६ वाजता आणलं जाणार आहे.
Pune Live : पुण्यातील चंदननगरमध्ये 50 झोपड्या आगीत खाकचंदननगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी येथे पहाटे 5 वाजता भीषण आग लागून जवळपास 10 च्यावर सिलेंडर फुटले असून सुमारे 50 च्यावर झोपड्या जळाल्या. आगीवर सद्यस्थितीत नियंत्रण मिळवले असून 100 च्यावर सिलेंडर बाहेर काढले. अद्याप जखमी कोणी नसल्याची प्राथमिक माहिती.
Pune Live : पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतलेकाश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान पंतप्रधान मोदी सौदी दौरा अर्धवट थांबवून दिल्लीत पोहोचले आहेत.