पंचांग -
बुधवार : चैत्र कृष्ण १०, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय पहाटे ३.२१, चंद्रास्त दुपारी २.१७, भारतीय सौर वैशाख ३ शके १९४७.
दिनविशेष -
२००१ - जीसॅट-१ या भूस्थिर उपग्रहाची भ्रमणकक्षा ११ हजार ९०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात ‘इस्रो’च्या अवकाशशास्त्रज्ञांना यश.
२००३ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य केल्याबद्दल डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर.