Tata Consumer आणि Bajaj Housing सह २८ कंपन्यांचे तिमाही निकाल आज, यादी तपासा
ET Marathi April 23, 2025 04:45 PM
मुंबई : एलटीआयमाइंडट्री, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स आणि बजाज हाऊसिंग फायनान्ससह २८ कंपन्या त्यांचे मार्च तिमाहीचे निकाल आज बुधवार, २३ एप्रिल रोजी जाहीर करतील. या कंपन्या ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या संपूर्ण आर्थिक वर्षातील त्यांची कामगिरी देखील जाहीर करणार आहेत. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी कामगिरी अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये टाटा टेलिसर्व्हिसेस, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज, ३६० वन डब्ल्यूएएम लिमिटेड, सिनजीन इंटरनॅशनल आणि रॅलिस इंडिया यांचा समावेश आहे. चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्या३६० वन डब्ल्यूएएम लिमिटेडएएनएस इंडस्ट्रीज लिमिटेडअ‍ॅस्टेक लाईफसायन्सेस लिमिटेडबजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकॅन फिन होम्स लिमिटेडदालमिया भारत लिमिटेडडेन नेटवर्क्स लिमिटेडएमको एलिकॉन (इंडिया) लिमिटेडफिलेटेक्स इंडिया लिमिटेडग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेडगुजरात हॉटेल्स लिमिटेडआयआयआरएम होल्डिंग्ज इंडिया लिमिटेडइंडियन बँक हाऊसिंग लिमिटेडइंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊस लिमिटेडखेतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडएलटीआयमाइंडट्री लिमिटेडमहाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडमुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेडरॅलिस इंडिया लिमिटेडरेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडसुप्रीम पेट्रोकेम लिमिटेडसिनजीन इंटरनॅशनल लिमिटेडटाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडथायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडटिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडतमिळनाड मर्कंटाइल बँक लिमिटेडटाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडवेंड्ट (इंडिया) लिमिटेड एचसीएलकडून लाभांश देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत ४,३०७ कोटी रुपयचांचा निव्वळ नफा नोंदवला. नफ्यात वार्षिक आधारावर ८% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३,९८६ कोटी रुपये होता.तिमाही निकाल जाहीर करताना एचसीएलटेकने भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीने प्रति शेअर १८ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. लाभांशासाठी रेकॉर्ड तारीखही निश्चित करण्यात आली आहे. या अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख २८ एप्रिल २०२५ असेल, असे एचसीएल टेकने म्हटले आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.