Jammu Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या ३ हल्लेखोरांचं स्केच समोर आलंय. या दहशतवाद्यांची ओळखही पटली असून त्यांची नावं आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा असल्याची माहिती समजते. द रेजिस्टंट फ्रंटचे हे दहशतवादी आहेत. लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेची सहकारी संघटना आहे. हल्ल्यावेळी घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हे स्केच तयार करण्यात आलेय.
दरम्यान, दहशतवाद्यांचा फोटोही समोर आला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव, धर्म विचारून गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर हल्लेखोर पहाडी जंगलात लपून बसले आहेत. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहिम राबवली जात आहे.
दहशतवाद्यांनी पहलामला येण्यासाठी कोणता मार्ग निवडला याचीही माहिती समोर आलीय. आतापर्यंतच्या चौकशीत अशी माहिती समोर आली की, १ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीत दहशतवादी भारतात घुसले. त्यानंतर राजौरीहून वधावन मार्गे पहलगामला आले.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक ग्रुप फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीत हल्ला केल्याचा दावा करण्यात येतोय. चार जणांचा हा फोटो असून यात तिघांनी काळे कपडे घातले आहेत. तर हातात एके ४७ रायफल आहेत. याशिवाय शस्त्रसाठाही सोबत दिसत आहेत.