आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची ही या हंगामात आणि साखळी फरीत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. उभयसंघात 17 एप्रिलला झालेल्या सामन्यात होम टीम मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर वानखेडे स्टेडियममध्ये 4 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अंत्यत साधेपणाने नाणफेक करण्यात आली. मुंबईने टॉस जिंकला. कर्णधार हार्दिक पंड्या याने हैदराबाद विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्णधार हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेण्यासह रोहित शर्माबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई चेसिंग करणार असल्याने रोहितचा पुन्हा एकदा सबस्टीट्यूट खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असल्याने त्याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश नाही.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी आणि एशान मलिंगा.