Latest Marathi News Updates : पुण्यात परप्रांतीय कर्मचाऱ्याने काढली मुलीची छेड
esakal April 23, 2025 08:45 PM
Pune Live : पुण्यात परप्रांतीय कर्मचाऱ्याने काढली मुलीची छेड

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असताना गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये एका परप्रांतीय कर्मचाऱ्याने मुलीची छेड काढून तिला अर्धातास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांना सदर विषयाची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीला चोप दिला.

Nashik Live : देवराई सान्निध्यात खुले वाचनालय

दोनशे ८० प्रकारच्या प्रजातीचे झाडे. त्यात ५० वेलींचे प्रकार, ४५ झुडूप, ३२ बांबूचे प्रकार, १६ आंब्याचे प्रकार असलेल्या सातपूर देवराई निसर्गाच्या सानिध्यात खुले वाचनालय साकारत आहे. येथील झाडांना क्यूआर कोड देण्यात आले आहेत. जेणेकरून वाचकांना एखाद्या झाडाविषयी माहिती घ्यावयाची झाल्यास कोड स्कॅन केल्यानंतर त्या झाडाविषयी इत्थंभूत माहिती मिळेल.

Live : "दोषींना सोडणार नाही "- केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की,"हा भ्याड हल्ला आहे. दोषींना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा मिळेल. हे निराशेतून आणि विकसित भारताच्या उभारणीच्या प्रगती प्रवासात अडथळा आणून उचललेले पाऊल आहे, परंतु भारत पुढे जात राहील. आम्ही पीडित कुटुंबांसोबत उभे आहोत आणि आमच्या संवेदना त्यांच्यासाठी व्यक्त करतो.."

Live : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसले यांच्या नातेवाईकांना परतीची तिकिटे मिळण्यात अडचणी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले यांच्या नातेवाईकांना परतीच्या विमान प्रवासाची तिकिटे मिळण्यात अडचणी येत असल्याची माहिती दिली.

Kolhapur Rain Live: कोल्हापुरात अवकाळी पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली

 कोल्हापुरात झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.. कोल्हापूरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल 10 हुन अधिक झाडे मुसळधार पावसामुळे कोसळून पडली आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील रस्ते कोसळून पडलेल्या झाडांमुळे बंद झाली आहेत.

Vidarbha Heat Wave: विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम

राज्यात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच तापमानाने ४५ अंशाचा टप्पा पार केला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण, तसेच दमट वातावरणाचा अंदाज आहे. चंद्रपूर येथे मंगळवारी ४५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याचबरोबर विदर्भातील इतर भागातही ४३ ते ४४ अंशाच्या दरम्यान तापमान होते.

Live : पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच - छगन भुजबळ

पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच - छगन भुजबळ

अश्या दुःखद प्रसंगी भारतीयांनी एकत्र राहण्याची गरज

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध - छगन भुजबळ

भारत सरकार झालेल्या घटनेचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही -छगन भुजबळ

Live : श्रीनगरमधून पुण्यात येणाऱ्या विमानाला उशीर

श्रीनगर येथून पुण्यात येणाऱ्या विमानाला उशीर होणार असून नवीन वेळापत्रकाप्रमाणे 23/25 वा पुणे एअरपोर्ट येथे येईल, अशी माहिती पुढे आली आहे.

Pune Live : शरद पवारांना भीमा कोरेगाव कमिशनकडून पत्र जाईल

शरद पवारांना भीमा कोरेगाव कमिशनकडून पत्र जाईल

शरद पवारांनी उद्धब ठाकरे मुख्यमंत्री असताना पत्रं दिल होत त्याची बातमी एका वर्तमान पत्रात आली होती

ते पत्र आयोगासमोर द्याव ही मागणी आम्ही केली होती

त्यावर आज सुनावणी झाली

मात्र पत्र दिल होती की नाही ही माहिती आयोगासमोर येईल

ही दंगल पूर्वनियोजित होती अस पत्रात म्हटल्याचा प्रकाश आंबेडकर यांच्या दावा

काश्मीर येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने निदर्शने

- काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

- सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला.

- दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.

- या आंदोलनात मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Pahalgam Terror Attack Live Update: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बॉलिवूडने व्यक्त केला शोक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बॉलिवूडने व्यक्त केला शोक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे."

विकी कौशल म्हणाला की, आशा आहे की या घृणास्पद कृत्यातील दोषींना शिक्षा होईल. पहलगाममधील या अमानवी दहशतवादाच्या कृत्यात ज्या कुटुंबातील सदस्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या दुःखाची मी कल्पनाही करू शकत नाही.

Pahalgam Terror Attack Live Update: अमित शहा म्हणाले- भारत दहशतवादासमोर झुकणार नाही

काश्मीर खोरे 35 वर्षांत पहिल्यांदाच बंद; अमित शहा म्हणाले- भारत दहशतवादासमोर झुकणार नाही

Mumbai Live: पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट; कुर्ल्यात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध

काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे जनतेमध्ये प्रचंड रोष असून, मुंबईतील कुर्ला भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जोरदार निषेध आंदोलन छेडले. या वेळी आंदोलकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत "पाकिस्तान मुर्दाबाद"च्या घोषणा दिल्या. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत, केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Nashik Live: नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळून व्यक्त केला संताप

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आंदोलन केले. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून संताप व्यक्त केला. मनसेने या हल्ल्यात बळी पडलेल्या 26 जणांना, ज्यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले

Nashik Live: नाशिकचे पर्यटक सुखरूप, पण काश्मीरमधील पर्यटनावर संकट

नाशिकचे ४० ते ५० पर्यटक सध्या काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती नाशिकच्या ब्रिजमोहन ट्रॅव्हल्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली आहे. यापैकी नाशिकच्या इंदिरानगरमधील चव्हाण कुटुंबातील चार जण पहलगाम येथे गेले होते आणि ते सुखरूप असून परतीच्या मार्गावर आहेत. मे महिन्यासाठी अनेक पर्यटकांनी काश्मीरचे बुकिंग केले असले तरी, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे अनेकांनी केलेली बुकिंग रद्द होण्याची शक्यता चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

Pahalgam Terror Attack Live Update: भाजप नेत्यांसह विविध हिंदू संघटनांच्या सदस्यांचा जम्मूमध्ये पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

जम्मूमध्ये पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध भाजप नेत्यांसह विविध हिंदू संघटनांचे सदस्य करत आहेत.

Pahalgam Terror Attack Live Update: पहलगाम दहशतवादी घटनेला खूप गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे'- गुलाम अहमद मीर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर म्हणतात, "गेल्या काही वर्षांपासून असे म्हटले जात होते की दहशतवादावर कडक कारवाई करण्यात आली आहे....त्यामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. या समस्येला खूप गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे."

J&K Live : बैसरणमध्ये सुरक्षा दलाकडून दुसऱ्या दिवशीही पाहणी

बैसरन खोऱ्यात आजही सुरक्षा दलांनी पाहणी केली. जिथे काल दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जखमी झाले होते.

J&K Live : बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला असून जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Pune Live : पुण्यातील 2 पर्यटकांचे पार्थिव विशेष विमानाने आणणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर संध्याकाळी ६ वाजता आणलं जाणार आहे.

Pune Live : पुण्यातील चंदननगरमध्ये 50 झोपड्या आगीत खाक

चंदननगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी येथे पहाटे 5 वाजता भीषण आग लागून जवळपास 10 च्यावर सिलेंडर फुटले असून सुमारे 50 च्यावर झोपड्या जळाल्या. आगीवर सद्यस्थितीत नियंत्रण मिळवले असून 100 च्यावर सिलेंडर बाहेर काढले. अद्याप जखमी कोणी नसल्याची प्राथमिक माहिती.

Pune Live : पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले

काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान पंतप्रधान मोदी सौदी दौरा अर्धवट थांबवून दिल्लीत पोहोचले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.