एमआयएस एसआरएच: हेन्रिक क्लेझन वन अफाटिंग, मुंबई 144 एका आव्हानासाठी!
Marathi April 24, 2025 12:34 AM

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (Mi vs SRH) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने आहे. या सामन्याचा टाॅस जिंकून मुंबईने हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात हैदराबादने मुंबईसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी डावाची सुरूवात केली. पण मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने या सलामी जोडीला जोरदार झटका दिला आणि दोघांनाही पेव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेड शून्यावर बाद झाला, तर अभिषेक 8 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर मुंबईचा माजी खेळाडू ईशान किशन फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण तोही जास्त प्रभाव पाडू शकला नाही, तो 1 धाव करून दीपक चहरच्या चेंडूवर यष्टीरक्षक रिकेल्टनच्या हातात झेलबाद झाला.

त्याच्यानंतर चहरने नीतीश कुमार रेड्डीला 2 धावेवर पेव्हेलियनमध्ये पाठवले. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि धमाकेदार अर्धशतक झळकावले. त्याने 44 चेंडूत 71 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले. क्लासेनची ही खेळी वाढत असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला तिलक वर्माच्या हातात झेलबाद केले.

त्यानंतर अभिनव मनोहरनेही हैदराबादसाठी उत्कृष्ट खेळी केली. त्याने 37 चेंडूत 43 धावा केल्या. दरम्यान त्याने 3 षटकारांसह 2 चौकार मारले. अशाप्रकारे हैदराबादचा संघ 8 गडी राखून 143 धावा करू शकला.

मुंबई इंडियन्ससाठी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दीपक चहरने 2 तर जसप्रीत बुमराह आणि कर्णधार हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आता मुंबईचा संघ कशाप्रकारे धावांचा पाठलाग करतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.