बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मीक कराडने मी निर्दोष असल्याच्या केलेल्या दाव्यावर आज कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विष्णू चाटेच्या अर्जावरही युक्तिवाद होणाची शक्यता आहे. विष्णू चाटेने लातूरच्या जेलवरून बीडमध्ये आणला जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये चार्ज फ्रेम होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आधीच्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी मागितलेली दोषारोप पत्रातील गोपनीय माहिती तसेच डिजिटल पुरावे देण्यात आले आहेत. तसेच मागील सुनावणी मध्ये वाल्मीक कराडने माझा आणि या गुन्ह्याचा काही संबंध नाही. मी निर्दोष आहे. मला दोष मुक्त करा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. तसेच विष्णू चाटे याने मला बीड जेलमध्ये ठेवावे असा अर्जही केला होता. या अर्जावर सुनावणीची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर केले जाऊ शकते. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळत आहे.
गेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली होती. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून आजच्या सुनावणीवेळी वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणीची दरम्यानची माहिती दिली होती. आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ, असं उज्ज्वल निकम म्हणाले होते. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र सादर केली. तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले होते.
आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र सादर केली होती. संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला. व्हिडीओ आरोपींनीच रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊ नये,अशा विनंती कोर्टाला केली, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी मागील सुनावणीवेळी दिली होती. आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्तीवर रितसर सुनावणी होईल. वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही, असा अर्ज केला आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे, अशी माहिती गेल्या सुनावणीवेळी वकील उज्वल निकम यांनी सांगितले होते.
अधिक पाहा..