पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान जाम टेन्शनमध्ये आहे. भारत पेहेलगाम हल्ल्याचा कसा बदला घेणार? ही चिंता त्यांना सतावत आहे. पाकिस्तानने घाबरलच पाहिजे, त्यांनी घाबरुन जाणं सुद्धा स्वाभाविक आहे. कारण बुधवारी संध्याकाळी भारताने ट्रेलर दाखवलाय. दारुगोळ्याशिवाय पहिला स्ट्राइक असा केलाय की, ते दीर्घकाळ लक्षात ठेवतील. पाकिस्तानला पाण्याच्या थेंबा-थेंबाला तरसवण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. सोबतच अटारी बॉर्डर बंद केली आहे. त्याशिवाय भारताने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध सुद्धा कमी केले आहेत. बुधवारी रात्री 10 वाजता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी प्रेस कॉन्फरन्स केली. त्यांनी यावेळी भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. भारताच्या Action नंतर पाकिस्तानला धक्का बसला आहे.
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानात बैठका आणि वक्तव्य सुरु झाली आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समिति (एनएससी) आपातकालीन बैठक बोलवली आहे. एनएससीच्या बैठकीनंतर इस्लामाबाद कठोर प्रतिक्रिया देईल असं पाकिस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानी नेवी अलर्टवर
भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होईल या भितीने पाकिस्तानने आपल्या नेवीला अलर्ट केलं आहे. पाकिस्तानला ही भिती सतावतेय की, पेहेलगाम हल्ल्यानंतर भारत एखाद्या ऑपरेशनमध्ये नेवीचा वापर करु शकतो. हेच पाहून पाकिस्तानात दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी करण्यात आली आहे.
फायटर जेट स्क्वाड्रन्सना हाय अलर्टवर
23 एप्रिलला लाइव्ह फायरिंग वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. ही वॉर्निंग 24 ते 25 एप्रिलसाठी आहे. वॉर्निंगमुळे कराची आणि ग्वादरजवळ एअरक्राफ्ट आणि मर्चेंट वेसेलला अभ्यास भागापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. पाकिस्तान नेवी या सरावात सर्फेस आणि सब सर्फेल लाइव्ह फायरिंगच प्रात्यक्षिक दाखवेल. पाकिस्तानच्या सर्व 20 फायटर जेट स्क्वाड्रन्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आलय. आर्मी चीफ मुनीर यांनी बुधवारी कमांडर्सची बैठक घेतली.
नोटिफिकेशन जारी
पाकिस्तान 24-25 एप्रिल रोजी कराचीच्या किनाऱ्यावर जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करेल. त्यासाठी त्यांनी नोटिफिकेशन जारी केलं आहे.
पुरावा दिलेला नाही
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार म्हणाले की, “अशा प्रकारच्या दहशतवादी घटनांवर संताप व्यक्त करणं योग्य नाही. भारताने दहशतवादी हल्ल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. भारत नेहमी आपल्या समस्यांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरतो. भारताची ही राजकीय चाल आहे, त्यापेक्षा काही नाही. पाकिस्तान सडतोड प्रत्युत्तर देईल” पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले की, “काही दिवसांनी बालाकोटमध्ये मोठा एअर स्ट्राइक होईल. ही गोष्ट इथेच थांबणार नाही. भारत पाकिस्तान विरुद्ध काही ना काही कारवाई करेलच”
नवाज शरीफ पाकिस्तानात येणार
एक्सप्रेस न्यूजच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे अध्यक्ष नवाज शरीफ यांनी लंडनहून पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना 25 एप्रिलच्या आपातकालीन ब्रीफिंगसाठी बोलावलं आहे. शहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक करण्याशिवाय नवाज शरीफ शुक्रवार ते रविवारपर्यंत पीएमएल-एनच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठक करतील.