‘आमच्यासोबत असलेला माणूस डोळ्यांदेखत गेला…’; संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर सांगित
Marathi April 24, 2025 12:33 PM

पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून पुण्यातील जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. पहलगाममध्ये मंगळवारी (दि.23) झालेल्या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. कुटुंबांनी तिथल्या आप्तेष्टांना संपर्क साधला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र बुधवारी दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच पुणेकरांचे मन हेलावले. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव विमानाने काल (बुधवारी) रात्री साडेअकराला पुण्यात आणणार होते. यामध्ये बदल करण्यात आला असून, हे दोन्ही पार्थिव गुरुवारी पहाटे आणण्यात येतील, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, आज संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्या पार्थिवच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले.

माझा नवरा माझ्यासोबत नाही

शरद पवार संतोष जगदाळेंच्या निवासस्थानी दाखल झाले, त्यांनी संतोष जगदाळेंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांंचं सांत्वन देखील त्यांनी केलं. यावेळी संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर आपबिती सांगितली. यावेळी त्यांनी हल्लेखोरांनी घोडेवाल्याला मारलं कारण तो प्रतिकार करत होता. लोकांना नका मारु. त्यांनी मास्क लावले होते. लोकांचे जीव धोक्यात घालू नका. माझा नवरा माझ्यासोबत नाही. आमच्यासोबत असलेल्या माणूस डोळ्यांदेखत गेला. माझी मुलगी आम्ही काय करायचं आता, ते लोकं रडले आमच्यासाठी, लोकांचे जीव गेले, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या कुटुंबांनी काय करायचं आता, असं म्हणत संतोष जगदाळेंच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.

संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे लहानपणापासून एकदम खास मित्र होते. बालपणापासूनच्या या मैत्रीचा शेवट मात्र, दुर्दैवी झाला. दोघेही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही बळी गेला. संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. तर शरद पवार कौस्तुभ गणबोटेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोम्बिवली
3) हेमंट जोशी- डोंबिव्हली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे-
1) एस बालचंद्रारू
2) सुबोध पाटील
3) शोबिट पटेल

https://www.youtube.com/watch?v=cvjrrogazmc

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.