ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब (हायपरटेंशन) हा 'सायलेंट किलर' मानला जातो. कारण त्याची सुरुवातीची लक्षणे दिसून येत नाहीत.
परंतु योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता. यावेळी कोणते पदार्थ जास्त खावे जाणून घ्या
पालक, कोथिंबीरसह अनेक हिरव्या पालेभाज्या रोज एक टाईम खावे. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पिस्त्यात पोटॅशियम, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
राजगिऱ्याच्या लाडू आहारात समावेश केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
बीट रूटमध्ये नायट्रेट्स असतात, जे रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. दररोज एक ग्लास बीट रूट ज्यूस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
हे सर्व पदार्थ हेल्दी आहेत. मात्र कोणत्याही आहारातील बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.