Kolhapur : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी पाच कंपन्यांनी भरल्या निविदा
esakal April 24, 2025 01:45 PM

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी परराज्यातील दोन, तर राज्यातील तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.

त्यांच्या कागदपत्रांची छाननी महापालिकेने सुरू केली आहे. महिनाअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र कंपन्यांची व्यापारी निविदा उघडली जाईल.

अंतर्गत महत्त्वाच्या असलेल्या ११ कोटी ७७ लाखांच्या कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. त्या १७ एप्रिलपर्यंत भरण्याची मुदत होती. आज त्या उघडण्यात आल्यानंतर कुणी भरल्या आहेत, त्यांची नावे समजली.

त्यामध्ये गोदरेज ॲंड बॉईस (मुंबई), सिष्ट्री एंटरप्रायझेस (चंदिगड), आदर्श इन्फ्रा (मुंबई), कांचन असोसिएटस् (नाशिक), एलएनए इन्फ्रा (जयपूर) या ठेकेदार कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्या कागदपत्रांच्या छाननीचे काम महापालिकेने सुरू केले आहे.

महिनाअखेरपर्यंत ते सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पात्र ठरणाऱ्या कंपन्यांची व्यापारी निविदा उघडली जाईल. त्यामध्ये ज्या कंपनीने कमी दर भरला असेल, त्यांना काम मिळणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निविदा व्ही. के. पाटील कंपनीला मिळाली आहे. त्यांना वर्कऑर्डर देण्याची तयारी सुरू आहे.

सध्या पहिल्या टप्प्यातील गॅलरीवरील कैच्या बसवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी भिंतीचे काही बांधकाम केले जात आहे. ते बांधकाम पक्के करण्यासाठी काही कालावधी जात आहे. त्यानंतर सर्व फॅब्रिकेशनचे काम असल्याने गतीने केले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.