पेण, ता. २४ (वार्ताहर) : भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील प्रा. डॉ. देवीदास बामणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देऊन पनवेल येथे सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकार इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कारांचे आयोजन पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात करण्यात आले होते. या पुरस्कारांमध्ये भाऊसाहेब नेने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात गेली ३० वर्षे हिंदी विषयाचे अध्यापन करणारे प्रा. बामणे यांनी आजपर्यंत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केले आहे. त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले असून इतर दोन पुस्तके आणि एक काव्यसंग्रह व दोन अनुवाद केलेली पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत. यावर्षी महाराष्ट्र हिंदी परिषद या साहित्य संस्थेचे संयुक्त सचिव म्हणून पाच वर्षांसाठी बिनविरोध निवड झाली आहे.