आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची स्थिती नाजूक आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सचा मैदानावरील वावर हा संघाला या संकटातून बाहेर काढेल असा नाही. कारण आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यात कर्णधार संजू सॅमसनला दुखापत झाल्याने बाहेर बसला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा रियान परागच्या खांद्यावर आली आहे. पण खेळाडूंची कामगिरी पाहता संघाचा मनोधैर्य खचलं असल्याचं दिसत आहे. या रियान परागने झेल सोडण्याची जणू मालिकाच सुरु केली आहे. यामुळे संघाचं नुकसान होत असल्याचं दिसत आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 42 व्या सामन्यात अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात रियान परागन अशीच चूक केली. आरसीबी फलंदाजी करत असातना राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाज फजलहक फारुखीच्या हाती चेंडू सोपवला. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. आरसीबीचा सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट स्ट्राईकला होता. फिल सॉलन्टने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिड ऑफकडे मारला. तेव्हा हा झेल रियान परागच्या जवळ गेला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण हातात काही बसला नाही.
झेल सोडला तेव्हा फिल सॉल्ट फक्त 1 धाव करून खेळत होता. पण त्यानंतर त्याने 23 चेंडूत 4 चौकार मारत 26 धावा केल्या. तसेच विराट कोहलीसोबत 40 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली. यामुळे संघाचं 25 धावांचं नुकसान झालं. दरम्यान, रियान परागने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 5 झेल घेतले आहेत. तर चार झेल सोडले आहेत. त्यामुळे त्याची झेल पकडण्याची क्षमता ही 55 टक्के आहे. कर्णधार असताना अशी चूक करणं म्हणजे गुन्हाच आहे. दुसरीकडे, फलंदाजीतही रियान पराग काही खास करू शकलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात अर्धशतकही ठोकलेलं नाही.
रियान परागचं गचाळ क्षेत्ररक्षण पाहून समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी चिंता व्यक्त केली. त्याच्या कर्णधारपदाचा दबाव असल्याचं सांगितलं. ‘रियान परागसाठी हे पर्व काही चांगलं नाही. त्याच्या कर्णधारपदाचा दबाव त्याच्या क्षेत्ररक्षणावर आहे का? आम्ही कर्णधारपदाच्या दबावात बॅटिंग आणि बॉलिंगवर परिणाम होताना पाहिलं आहे. आता फिल्डिंगही दिसत आहे.’, असं सुनील गावस्कर म्हणाले.